आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा फटका:रेल्वेचेे 24 हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान; आधी प्रवाशांमुळे रोज 153 काेटींची कमाई, आता 22 कोटी

शरद पांडेय | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रवासी गाड्या रद्द, मात्र मालवाहतुकीमुळे 80% पर्यंत उत्पन्न रिकव्हर

कोरोना काळात प्रवासी रेल्वे ठप्प व मालवाहतूक घटल्याने रेल्वेला २४,७१७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात १८,३९९ कोटी रुपये पॅसेंजर ट्रेन (१२ ऑगस्टपर्यंत) व ६,३१८ कोटींच्या माल वाहतुकीचा (३ महिने) समावेश आहे. दिलासा म्हणजे, मालवाहतुकीत गतवर्षाच्या तुलनेत केवळ २०% घट झाली. तथापि, प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात ८६% घट झाली आहे. प्रवासीही २ टक्केच आहेत. सध्या केवळ २३० विशेष रेल्वे सुरू आहेत. 

पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने नुकसान : १८,३९९ कोटी 

१४४ दिवसांत २१,९३९ कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. २३० विशेष रेल्वेंतून रोज २२ कोटींचे उत्पन्न मिळत आहे. १२ आॅगस्टपर्यंत ३,१६८ कोटी रुपये मिळतील. ४६०० श्रमिक रेल्वेतून ३७२ कोटींचे उत्पन्न मिळाले. विशेष रेल्वेचे उत्पन्न वजा केल्यास १८,३९९ कोटींचे नुकसान होऊ शकते. रेल्वेने २२ मार्चला सर्व १३ हजारांपेक्षा जास्त रेल्वे रद्द केल्या होत्या. ८ हजारांवर मालगाड्या रोज धावत होत्या. २०१९ च्या तुलनेत ३ महिन्यांत सरासरी ८०% पर्यंत माल वाहतूक झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार स्पेशल रेल्वे वगळता दैनंदिन रेल्वेगाड्या न धावल्याने तिकिटांच्या महसुलात १४४ दिवस (१२ आॅगस्टपर्यंत) १८,३९९ कोटींच्या नुकसानीचा अंदाज आहे. 

मालवाहतुकीचे ३ महिन्यांत नुकसान: ७,३१८ कोटी रु.

मालगाड्यांचे वार्षिक उत्पन्न १,२८,४२२ कोटी व रोजचे ३५१ कोटी रुपये आहे. ते ३ महिन्यांत २०१९ च्या तुलनेत ८०% पर्यंत कायम आहे. म्हणजे राेज ७० कोटींचे नुकसान होत आहे. मालवाहतुकीतून तीन महिन्यांत सरासरी ६,३१८ कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

पगार-पेन्शनवर मोठा खर्च

मुख्य उत्पन्न (कोटी रुपये वार्षिक)

> मालवाहतूक    1,28,422  > पॅसेंजर    56,000 > पार्सल सेवा    6,000 > अन्य स्रोत    9,000 

मुख्य खर्च (कोटी रुपये वार्षिक)

> वेतन    86,904.44 > डिझेल खर्च    17,783 > वीज    10,997 > पेन्शन फंड    48,450

0