आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona In Ayodhy; 16 Security Personnel, Including Pradip Das, A Priest From Ram Janmabhoomi, Were Infected With The Corona

अयोध्येत कोरोना:राम जन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास यांच्यासह सुरक्षेतील 16 पोलिसांना कोरोनाची लागण

अयोध्या3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे भूमीपूजन होणार आहे

येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला सकाळी अयोध्येला पोहोचणार आहेत. या कार्यक्रमात 200 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. यात साधू, संत, अधिकारी, नेते, विहिप- न्यास यांच्या व्यतिरिक्त देशातील 50 विशेष अतिथी सहभागी होतील. परंती, याआधी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. या कार्यक्रमावर कोरोनाचे सावट आले आहे. राम जन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. ते मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत आणि तेही भूमीपूजनाच्या सोहळ्यात येणार होते.

सध्या मंदिरात 5 पुजारी आहेत. यात मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्यानंतर प्रदीप दास आहेत. मंदिरातील व्यक्तींनाच कोरोना झाल्यामुळे अयोध्या प्रशासन चिंतेत आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराचे भूमीपूजन करणार आहेत. या भूमीपूजनासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. या भूमी पूजनानंतर मंदिराच्या निर्माणाचे कार्य सुरू होईल.

अयोध्येत एकाच दिवसात 66 नवीन रुग्ण सापडले

अयोध्येत बुधवारी 66 नवीन रुग्ण सापडले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामलला मंदिरातील पुजाऱ्यांसह 16 पोलिसांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. नवीन रुग्ण न्यू झारखंडी कॉलोनी, राम नगर, आरपीएफ पोस्ट, अवधपुरी कॉलोनी, सुरसर कॉलोनी, लक्ष्मणपुरी कॉलोनी, कौशलपुरी, सिविल लाइन, चौक, पोलिस लाइन, थाना कोतवाली नगर, हनुमानगडी डिफेंस कॉलोनीतील आहेत. सध्या जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांची संख्या 1,041 झाली आहे, तर यातील 657 रुग्ण ठीक झाले आहेत.