आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील कोरोना व्हायरसचा स्त्रेत यूरोप, ओशिआनिया, मध्य आणि दक्षिण आशिया आहे. हा दावा इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायंसच्या रिसर्चमध्ये संशोधकांनी केला आहे. त्यांचे म्हणने आहे की, भारतीयांनी त्या देशात जास्त प्रवास केल्यामुळे हा व्हायरस तेथून भारतात आला. कोरोना व्हायरसच्या जीनोम सिक्वेंसचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हा दावा केला आहे.
असा झाला रिसर्च
रिसर्चदरम्यान भारतीय कोरोना कोरोना रुग्णांचे दोन समहु बनवण्यात आले, ए आणि बी. करंट सायंस जर्नलमध्ये प्रकाशित शोधानुसार, कोरोनासंक्रमित 137 पैकी 129 रुग्णात असलेल्या व्हायरसचा जीनोम सिक्वेंस असा होता, जो एखाद्या विशेष देशाकडे बोट करत आहे. समूह-ए मध्ये असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा तो स्ट्रेन मिळाला जो ओशिआनिया, कुवैत आणि साउथ आशियातील देशात पसरला आहे.तर, समूह-बी मध्ये मिळालेला कोरोना यूरोपमध्ये संक्रमण पसरणाऱ्या व्हायरसमधून मिळाला. रुग्णांमध्ये मिडल ईस्टचा व्हायरस असल्याचेही समोर आले.
चीन आणि शेजारील देशांमधून आलेल्या भारतीयांमुळे पसरला व्हायरस
संशोधकांनी सांगितल्यानुसार, प्रवास करुन भारतात आलेल्या काही रुग्णांमध्ये चीन आणि ईस्ट आशियामध्ये पसरलेला व्हायरस आढळला. यावरुन हे सिद्ध होते की, भारतातील व्हायरस चीन आणि शेजारील देशातून पसरला आहे. हा व्हायरस चीनमध्ये पसरलेल्या व्हायरस प्रमाणे आहे.
प्रवासाची ठोस माहिती नाही
कोरोना रुग्णांच्या प्रवासाची ठोस माहिती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती नसल्यामुळे कोणत्याही निर्णयावर पोहचणे अवघड आहे. व्हायरसच्या संक्रमणाची उत्पत्ती कुठून झाली, याबाबत सांगणे सध्या अवघड आहे. या अभ्यासातून हे समजते की, भारतातील व्हायरसचा संबंध यूरोप, ओशिआनिया, मध्य व दक्षिण आशियातील देशांशी आहे.
जीनोम सिक्वेंसिंग आणि रुग्णांचा आकडा महत्वाचा घटक
रिसर्च सांगतो की, कोरोनाचा जीनोम सिक्वेंसिंग आणि रुग्णांची आकडेवारी कोरोनाचा सामना करण्यात फायदेशीर ठरते. जीनोम सिक्वेंस सांगतो की, व्हायरसचे किती रुप आहेत, जे संक्रमण पसरवत आहेत. रिसर्च टीममध्ये इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायंसचे मायक्रोबायोलॉजी अँड सेल बायोलॉजी डिपार्टमेंटचे प्रो. कुमारावेल सोमसुंदरम, मैनक मंडल आणि अंकिता लावरडे सामील आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.