आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोनाचा घसरता आलेख:देशात गेल्या 24 तासात 1.27 लाख रुग्णांची नोंद; तर 2.30 लाख रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात गेल्या 24 तासात 1.27 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 2.30 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर 1059 जणांना कोरोना उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यापुर्वी गुरुवारी देशात 1.49 लाख रुग्ण आढळले होते. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 21 हजार 442 रुग्ण कमी आढळले आहेत.

कोरोना तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत असून, सलग दुसऱ्या दिवशी 1.5 लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. 20 जानेवारीपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. देशात सध्या 13.31 लाख रुग्णांवर विविध भागात उपचार सुरू आहेत. कोरोना या भयावह विषाणूने आतापर्यंत 4.20 लाख जण ग्रासले आहेत.

दरम्यान दिल्लीत मास्क संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत आता कारमध्ये मास्क अनिवार्य नसणार आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी उशिरा रात्री ही माहिती दिली. यापूर्वी दिल्लीत कार चालवताना मास्क घालणे बंधनकारक होते. तसेच एखाद्याने मास्क घातले नाही तर, त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत होती. मात्र दिल्ली सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी देशाचा पॉझिटिव्हीटी रेट हा 7.98% इतका झाला आहे. त्यापूर्वी गुरुवारी हा दर 9.27 टक्के इतका होता.

एक नजर कोरोना आकड्यांवर
देशातील कोरोनाग्रस्त 4.20 कोटी
बरे झालेले रुग्ण 4.02 कोटी
कोरोना मृत्यू 5.01 लाख

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात 13 हजार 840 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 81 जणांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान 27 हजार 891 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. गुरुवारी राज्यात 15 हजार 252 रुग्ण आढळले होते. तर 75 जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या घटली असून, सध्या 1.44 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...