आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona In India : The Task Of Bringing Back The Stranded Indians In Maldives And UAE Begins, The Navy Put Its Ships Jalashv, Magar And Shardul In Operation

मदत:परदेशात अडकलेल्या 14 हजार 800 भारतीयांना 64 विमानांनी भारतात आणणार, मायदेशी परतण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे आवश्यक

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृह मंत्रालयानुसार - कोरोना संसर्गाची लक्षणे नसणाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल
  • लोकांना आणण्यासाठी प्रोटोकॉल बनविला, देशात आल्यानंतरही लोकांची चाचणी होणार, 14 दिवस क्वारंटाइन केले जाणार

कोरोना विषाणूच्या साथीमुळे आखाती देशांसह जगभरातील 12 देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना तयार केली आहे. 7 मे पासून सुरु होणाऱ्या या अभियानात 12 देशांत 64 विमाने पाठवण्यात येणार आहे. या लोकांमध्ये भारतीय विद्यार्थी आणि मजुरांसह 14 हजार 800 लोकांचा समावेश असेल. दररोज सुमारे 2000 लोकांना आणण्याची योजना आहे. त्यांना भारतात येण्यापूर्वी काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. भारत सरकारने परत येण्यास इच्छुकांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. यासाठी नोंदणी फॉर्मही जारी करण्यात आला आहे. परत येण्यासाठी फॉर्म पूर्ण भरणे आणि कोरोना चाचणी घेणे आवश्यक असेल.

गृह मंत्रालयानुसार, ज्या लोकांमध्ये संसर्गाची लक्षणे नाहीत अशाच लोकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. भारतात आल्यानंतर आवश्यक तपासणी केली जाईल व त्यांना 14 दिवस क्वारंटाइन करण्यात येईल. लोकांना आणण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रोटोकॉल तयार केला गेला आहे. मोहिमेदरम्यान या प्रोटोकॉलचे करावे लागले. जगभरातील भारताचे दुतावास आणि उच्च कमिशन तेथे अडकेलल्या भारतीयांची यादी तयार करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...