आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona In India | Today More 1.68 Lakh Petient Corona Positive In India And 277 Death 

देशाच्या चिंतेत आणखी भर:देशात गेल्या 24 तासात 1.68 लाख जणांना कोरोनाची लागण, तर 277 जणांचा मृत्यू; सक्रिय रुग्ण 8 लाख

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. देशात गेल्या 24 तासात 1.67 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिलादायक म्हणजे 69 हजार 798 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासात 277 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 8 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही एक चिंतेची बाब म्हणावी लागेल कारण आकरा दिवसांपूर्वी हा आकडा फक्त एक लाख होता.

दरम्यान मंगळवारी दिल्लीत कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी देखील दिल्लीत 17 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्याभरात दिल्लीत सुमारे 87 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवला आहे. ज्यातील 57 मृत्यू हे तीन दिवसांतच झाले आहे. दिल्लीच्या अगोदर महाराष्ट्रात 4 जानेवारीला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एकाच दिवसात तब्बल 20 जणांचा मृत्यू झाला होता.

गेल्या 24 तासात राजधानी नवी दिल्लीत 21,259 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी येथे 19,166 रुग्ण सापडले होते. सध्या राजधानीत 74 हजार 881 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण देखील 25 टक्क्यांवरुन 25.65 टक्के इतका वाढला आहे.

राज्यात 120 पोलिसांना कोरोनाची लागण

राज्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून, गेल्या 24 तासात 120 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर एका पोलिस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...