आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागृह मंत्रालयाने लॉकडाऊनमधील दिलेल्या सवलतींसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंगळवारी ही माहिती मंत्रालयातील सहसचिव पुण्यसिला श्रीवास्तव यांनी दिली. त्यांनी सांगितले की आता एका दुकानात 5 पेक्षा जास्त लोक उभे राहणार नाहीत हे दुकानदाराने सुनिश्चित केले पाहिजे. तसे न केल्यास कारवाई केली जाईल. दरम्यान आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, मागील 24 तासांत 3900 कोरोनाची प्रकरणे समोर आली तर 195 मृत्यू झाले. एका दिवसाच्या मृत्यूमधील आणि प्रकरणातील आकडेवारीतील हे सर्वात जास्त आहे.
संसर्ग दुपटीचा दर 12 दिवस, तर रिकव्हरी रेट 27.4% झाला
अग्रवाल यांनी सांगितले की, संसर्ग दुपटीचा वेग 11 दिवसांवरून 12 दिवस झाला आहे. आता दर 12 दिवसांनी संक्रमित लोकांची संख्या दुप्पट होत आहे. देशात मागील एक दिवसात 1020 संक्रमित बरे झाले आहेत. आतापर्यंत 12 हजार 716 लोकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. सोबतच रिकव्हरी रेट 27.4% झाला आहे.
आतापर्यंत 62 गाड्या धावल्या
गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिवांनी सांगितले की, देशातील विविध भागात अडकलेल्या प्रवासी कामगार, विद्यार्थी आणि प्रवाशांच्या वाहतुकीसाठी रेल्वेने 62 गाड्या चालवल्या आहेत. सुमारे 72 हजार प्रवाशांना ही सुविधा मिळाली आहे. आज 13 अतिरिक्त गाड्या चालवल्या जातील.
सार्वजनिक ठिकाणी या सूचनांचे पालन करणे बंधनकारक
> सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे आवश्यक आहे.
> सोशल डिस्टन्सचे पालन करावे लागेल.
> सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हा ठरेल.
> सार्वजनिक ठिकाणी दारू, पान-तंबाखू इत्यादींचे सेवन करण्यास मनाई आहे.
> दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन करणे आवश्यक आहे.
> दुकानांमध्ये 5 पेक्षा जास्त लोक दुकानांमध्ये राहू शकत नाहीत
> लग्नाच्या समारंभात 50 हून अधिक लोक उपस्थित राहू शकत नाहीत.
> अंत्यसंस्कारात 20 पेक्षा जास्त लोक असू शकत नाहीत.
ऑफिसच्या ठिकाणी या नियमांचे पालन करावे लागेल
> सर्वांना मास्क घालणे आवश्यक आहे. > कार्यालयाला नेहमीच सॅनिटाइज केले पाहिजे. > हँडवॉश सुविधा देणे बंधनकारक आहे. > कामाच्या शिफ्टमध्ये काही अंतर असावे. > प्रत्येकाला वेगवेगळा दीर्घकाळ ब्रेक दिला जावा. > आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करणे सर्व कर्मचार्यांना आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.