आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona In Railway | 872 Central And Western Railway Employees And Their Family Members Have Been Infected With Corona, 86 People Have Died

रेल्वेत कोरोना:मध्य आणि पश्चिम रेल्वेचे 872 कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण; आतापर्यंत 86 लोकांचा झाला मृत्यू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकूण संक्रमितांपैकी 559 मध्य रेल्वेचे आणि 313 पश्चिम रेल्वेचे कर्मचारी : रेल्वेची माहिती

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 872 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 86 जणांचा मृत्यू झाला. सध्या सर्वांना पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रेल्वेने सांगितले की, एकूण संक्रमितांपैकी 559 मध्य रेल्वे आणि 313 पश्चिम रेल्वेतून आहेत. 86 मृतांपैकी 22 जण सध्याचे रेल्वे कर्मचारी (मध्ये रेल्वेचे 14 आणि पश्चिम रेल्वेचे 8 कर्मचारी) होते आणि इतर त्यांच्या परिवारातील सदस्य आणि निवृत्त कर्मचारी होते. यातील 132 लोक एखाद्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नातेवाईक आहेत.  

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 700 गाड्या धावतात

मध्य आणि पश्चिम रेल्वे सध्या काही विशेष ट्रेन्स, मालगाडी आणि मर्यादित प्रवाशांसह 700 गाड्या चालवित आहे.  15 जूननंतर लोकल ट्रेन सेवा पुन्हा सुरू झाल्यापासून संक्रमित रेल्वे कर्मचार्‍यांची संख्या वाढल्याचा काही रेल्वे संघटनांनी दावा केला आहे. 

100 टक्के रेल्वे कर्मचारी फील्डवर काम करत आहेत

राष्ट्रीय रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष वेणु नायर म्हणाले की, "राज्य सरकारने कार्यालयांमध्ये फक्त 15 ते 30 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला मंजुरी दिली मात्र रेल्वेत जवळपास 100 टक्के फील्ड कर्मचारी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू असल्याने काम करत आहेत."

रेल्वे सतत सतर्कता बाळगत आहे

मध्य रेल्वचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार सांगतात की, " प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सतर्कता बाळगत आहे." झोनल रेल्वेचे म्हणणे आहे की कोविड-19 ची प्रकरणे वाढण्यात आणि सेवा पुन्हा सुरू करण्यामध्ये कोणताही संबंध नाही.

कोरोनापासून बचावासाठी 'रेल फॅमिली केअर' मोहीम

ते म्हणाले की, कोविड-19 साथरोगानंतर मध्य रेल्वेने 'रेल्वे फॅमिली केअर' अभियानाची सुरुवात केली जेणेकरून रेल्वे कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. पश्चिम रेल्वेचे मुंबई भागातील डीआरएम यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. 

0