आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona In The Country | 1 Lakh 7 Thousand 848 New Patients Were Found In The Country Today

देशात कोरोना:देशात दिवसभरात आतापर्यंत 1 लाख 7 हजार 848 नवे रुग्ण आढळले, महाराष्ट्रात 36 हजार आणि दिल्लीत 15 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेने जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत देशभरात 1 लाख 7 हजार 848 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तिसरी लाट सुरू झाल्यानंतर प्रथमच हा आकडा एक लाखाच्या पुढे गेला आहे. महाराष्ट्र (36,265) आणि दिल्ली (15,097) ही दोन राज्ये आहेत जिथे देशभरात आढळलेल्या नवीन रुग्णांपैकी निम्मे संक्रमित आहेत.

गुरुवारी देशात 29,675 रुग्ण बरे झाले आहेत, तर 290 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 364 झाली आहे.

संसर्ग सुमारे 5 पट वेगाने वाढतोय
यापूर्वी गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी भारतात 9765 नवीन रुग्ण आढळले होते. 15 डिसेंबरला 7974 केसेस आल्या होत्या. त्याचवेळी, 31 डिसेंबर रोजी हा आकडा 23 हजारांच्या जवळ होता. 31 डिसेंबरपासून आजपर्यंतचा आकडा पाहिला तर, संक्रमित लोकांची संख्या सुमारे 5 पटीने वाढली आहे.

दिल्लीत 3 दिवसात 15 हजार केसेस 3 पट वेगाने
दिल्लीत कोरोना संसर्गाचा वेग तीन दिवसांत तिपटीने वाढला आहे. 4 जानेवारी रोजी दिल्लीत 5481 प्रकरणे नोंदवली गेली, 5 जानेवारी रोजी प्रकरणे 10,665 झाली. 6 जानेवारी रोजी म्हणजेच आज 15,097 प्रकरणे आढळून आली आहेत. आज 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. दिल्लीत सकारात्मकता दर 15.34% वर गेला आहे.

मुंबईत विक्रमी 20,181 संक्रमित, 85% रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत
येथे, गुरुवारी मुंबईत 20,181 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे सक्रिय प्रकरणांची संख्या 79,260 झाली आहे. आज मुंबईत 67 हजार लोकांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी 20181 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. म्हणजेच आज सकारात्मकता दर 29.90% नोंदवला गेला.

आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी 17145 (85%) रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. काल हा आकडा 90% होता. त्याचवेळी, मुंबईतील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये विक्रमी 107 रुग्ण आढळले आहेत. संसर्ग सुरू झाल्यापासूनचा हा सर्वोच्च आकडा आहे.

बातम्या आणखी आहेत...