आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases & Vaccination, Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus Ne

देशात कोरोना:सक्रिय रुग्णांमध्ये 2709 ने झाली घट, सध्या 3.76 लाख रुग्णांवर सुरुये उपचार, 145 दिवसांमधील सर्वात कमी आकडा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 दिवसात 30 हजार सक्रिय रुग्ण कमी

देशात रविवारी कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. 33 हजार 212 नवीन रुग्ण आढळले. तर 35 हजार 497 रुग्ण बरे झाले आहे. 421 जणांचा मृत्यू झाला. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 709 ने घटली आहे. आता 3.76 लाख रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हा आकडा 23 मार्चनंतर सर्वात कमी आहे.

महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या
राज्यभरात रविवारी 4 हजार 797 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच 3 हजार 710 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला. तर 130 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 64 हजार 219 एवढी आहे.

देशात कोरोना महामारीची आकडेवारी
गेल्या 24 तासांमध्ये एकूण नवीन रुग्ण- 33,212
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे- 35,497
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू- 421
आतापर्यंत एकूण संक्रमित- 3.22 कोटी
आतापर्यंत बरे झालेले- 3.14 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू- 4.31 लाख
सध्या उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या- 3.76 लाख

बातम्या आणखी आहेत...