आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona In Tirupati Balaji Temple | 140 Corona Positive In Staff, Pressure On Trust To Close Temple Again

तिरुपती बालाजीमध्ये कोरोना:मंदीर स्टाफमधील 140 जण कोरोना पॉझिटिव्ह, 14 पुजाऱ्यांनाही लागण; मंदिर पुन्हा बंद करण्यासाठी ट्रस्टवर दबाव

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण तिरुपती शहरात एक हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
  • संक्रमित कर्मचार्‍यांना क्वारंटाइन केले
  • मंदिरात दर्शन बंद करण्याची कोणतीही चर्चा नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात सर्व सुरक्षा व्यवस्था असूनही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत ट्रस्टचे 100 हून अधिक कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. 14 पुजाऱ्यांसह जवळपास 140 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. अशा परिस्थितीत मंदिरातील कर्मचारी संघटना व राजकीय पक्षांकडून सध्या काही दिवस मंदिरातील दर्शन बंद करण्याचा दबाव येत आहे. दुसरीकडे मंदीर ट्रस्ट सध्या दर्शनावर बंदी घालण्याचा विचार करत नाही. 

8 जून रोजी अनलॉक 1 अंतर्गत मंदिर उघडण्यात आले होते. 11 जूनपासून सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू झाले. मात्र, 13 जूनपासून मंदिरातील कर्मचार्‍यांमध्ये कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. तिरुपती शहरातील 36 भाग कंटेन्मेंट झोन होते. 6 हजारांपासून सुरू झालेली भाविकांची संख्या 15 हजारांपर्यंत पोहचली होती, परंतु मंदिरात कोरोना प्रादुर्भाव पाहत ही संख्या कमी होत आहे. सध्या मंदिरात दररोज 8 ते 9 हजार भाविक दर्शनासाठी येत आहेत. 

मंदिराचे 12 कर्मचारी आणि 14 पुजारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मंदिर बंद करण्याची मागणी पुन्हा करण्यात येत आहे. गुरुवारी कर्मचारी संघटनेने देखील ट्रस्टकडे मंदीर बंद करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून इतर कर्मचारी आणि पुजाऱ्यांना कोरोना होण्यापासून वाचवता येईल. राज्याचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनीही परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी आंध्र सरकारकडे केली आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बरेड्डी म्हणतात की, सध्या मंदिरातील परिस्थिती नियंत्रणात आहे, म्हणून मंदिर पुन्हा बंद करण्याचे कोणतेही औचित्य नाही. पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

मंदिरात ट्राय-ओझोन स्प्रे सिस्टम परंतु तरीही केस वाढत आहेत  

तिरुपती बालाजी हे बहुधा भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिरात ट्राय-ओझोन स्प्रे सिस्टम बसविण्यात आले आहे. यामध्ये मंदिरात येणा-या लोकांवर नेहमीच स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण होते. जेथे लोक मंदिरात प्रवेश करतात आणि रांगेत लागतात, तेथे कारंजेद्वारे सतत सॅनिटायझेनशचे कामे केली जातात. असे असूनही, मंदिरात कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या सतत वाढत आहे.