आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona India: 11 Thousand 786 People Have Recovered So Far, Recovery Rate Reached 27.4%

समाधानकारक:आतापर्यंत 11 हजार 706 रुग्ण कोरोनामुक्त झाले; रिकव्हरी रेट 27.5% वर, 5 दिवसानंतर 3.7% वाढ

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या देशात 42 हजार 533 रुग्ण, 12 हजार तक्रारींवर कारवाई केली

केंद्र सरकार कोरोना व्हायरसबाबत दररोज पत्रकार परिषदेत माहिती देते. सोमवारी आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हटले की, आतापर्यंत 11 हजार 706 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रिकव्हरी रेट 23.8% वरुन 27.52% झाला आहे. सोशल डिस्टेंसिंगचे अजून चांगल्याप्रकारे पालन केल्यास ही महामारी लवकर दूर होईल.

लव अग्रवाल पुढे म्हणाले की, कंटेनमेंट झोन आणि याच्या बाहेरही आपल्याला सर्वप्रकारची सावधगिरी बाळगायची आहे. ज्या ठिकाणी सवलत दिली आहे, तिथेही जास्त गर्दी करू नका. या लॉकडाउनदरम्यान आपल्याला आपली सामाजिक जबाबदारी सांभाळावी लागेल.

सध्या देशात 42 हजार 533 रुग्ण

अग्रवाल पुढे म्हणाले की, आतापर्यंत 112 जिल्ह्यात फक्त 610 रुग्ण आहेत. हे देशातील एकूण रुग्णांच्या 2% आहेत. या जिल्ह्यांमध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात जागरुक करण्यात आले. सध्या देशात एकूण 42 हजार 533 रुग्णांची नोंद झाली आहे. आम्ही तपासण्या वाढवल्या आहेत आणि रुग्णांना कोरोनामुक्त करण्यावर भर देत आहोत. आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट आणि उपकरणांची पुर्तता केली जात आहे. आम्ही लवकरच आजी-आजोबा अभियान सुरू करणार आहोत, यात वृद्धांची काळजी कशी घ्यावी, याबाबत नागरिकांना जागरुक केले जाणार आहे.

चाचण्या वाढत आहेत

अग्रवाल पुढे म्हणाले की, आम्ही परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करत आहोत. देशात सध्या चाचण्यासंबंधी कोणताच मुद्दा नाही. काल 57 हजार 774 चाचण्या झाल्या आहेत. 1 एप्रिलला 70 हजार टेस्ट झाल्या होत्या. राज्यांच्या मदतीसाठी 20 टीम्स पाठवण्यात आल्या आहेत. जास्त रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये जास्त काम करण्याची गरज आहे. या राज्यातील संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील.

'आरोग्य सेतू मित्र अॅप' लॉन्च होईल

एमपावर ग्रुपने सांगितले की, आतापर्यंत 9 कोटी लोकांनी 'आरोग्य सेतू' अॅप डाउनलोड केले

आहे. आता 'आरोग्य सेतू मित्र अॅप' लॉन्च होईल. यात टेलीमेडिसिनची माहिती दिली जाईल. आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मदत घेत आहोत. यातून आम्ही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांची ओळख पटवून त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यावर भर देणार आहोत.

12 हजार तक्रारींवर कारवाई केली

गृह मंत्रालयच्या संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव म्हणाल्या की, मंत्रालयाची कंट्रोल रुम वेगाने काम करत आहे. 3 मे पर्यंत 12 हजार तक्रारींवर कारवाई झाली आहे. अर्थ व्यवस्थेला गती देण्यासाठी मालवाहू गाड्यांना परवानगी देण्यात आली आहे. जर त्यांना काही त्रास असेल, तर त्यांनी गृह मंत्रालयच्या हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करू शकता. किंवा नॅशनल हायवेवर असताना 1033 वर मदतीसाठी कॉल करू शकता. त्यांनी पुढे सांगितले की, ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेवलपमेंटच्या सल्ल्यानंतर सर्व सुरक्षा दलांना काम करतना कोणत्या प्रकारची सावधगिरी बाळगावी याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच, तुरुंग प्रशासनालाही कैद्यांच्या सुरक्षेबाबत योग्य दिशा निर्देशे देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...