आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागच्या काही दिवसांत दिलासा मिळाल्यानंतर बुधवारी दैनंदिन कोरोनाच्या रुग्णांमध्ये 26 टक्के वाढ आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 44 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. बुधवारी, कोरोनाचे 2897 नवीन रुग्ण, तर 54 मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, डेली पॉझिटिव्हिटी रेट 0.61% आणि वीकली पॉझिटिव्हिटी रेट 0.74% पर्यंत वाढला आहे.
गेल्या 24 तासांत 2908 लोक कोरोनामधून बरे झाले असून, त्यानंतर बरे झालेल्यांची संख्या 4 कोटी 25 लाखांच्या जवळ पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा 5 लाख 24 हजारांवर पोहोचला आहे. सोमवारी, 2288 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि 10 मृत्यू झाले. रविवारी 2893 नवीन रुग्ण आढळले. तर शनिवारी 3765 नवीन रुग्ण आढळले होते.
केरळमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू
कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 54 आहे, त्यापैकी 48 फक्त केरळमध्ये नोंदले गेले आहेत. तर दिल्ली, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यानंतर महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यूची एकूण संख्या 1,47,849, केरळमध्ये 69,325, दिल्लीत 26,183, उत्तर प्रदेशमध्ये 23,511 झाली आहे.
दिल्लीत सर्वाधिक रुग्णसंख्या
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी दिल्लीत 970 नवीन रुग्ण आणि एका मृत्यूची नोंद झाली, तर पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन 3.34% वर आला आहे. दिल्लीत एका दिवसात कोरोनाच्या 29,037 चाचण्या करण्यात आल्या होत्या.
मध्य प्रदेश आणि राजस्थान कोरोना अपडेट
बुधवारी मध्य प्रदेशात कोरोनाचे 45 नवीन रुग्ण आढळून आले असून, त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 10 लाख 42 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही, त्यामुळे कोरोनामुळे मृतांचा आकडा 10,735 वर राहिला आहे. पॉजिटिव्हिटी रेट प्रति 100 चाचण्यांमध्ये 0.5% आहे. राज्यात कोरोनाच्या 7 हजार 763 चाचण्या झाल्या.
त्याच वेळी, राजस्थानमध्ये 71 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एकही मृत्यू झालेला नाही. राजस्थानमध्ये 625 कोरोना सक्रिय प्रकरणे आहेत आणि एकूण प्रकरणे 12 लाख 85 हजारांच्या जवळ पोहोचली आहेत. बुधवारी राज्यात 6777 चाचण्या घेण्यात आल्या.
सिम्बायोसिस विद्यापीठाचे प्रकरण उच्च न्यायालयात
पुण्यातील सिम्बायोसिस विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. कोरोनाचा पूर्ण डोस घेईपर्यंत कर्मचाऱ्याला पगाराशिवाय रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना एचआर विभागाकडून एक मेल आला, ज्यामध्ये कोरोनाचा पूर्ण डोस न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना लस मिळेपर्यंत पगाराशिवाय रजेवर जाण्याचे लिहिले होते. यासोबतच कोरोना लसीकरण प्रमाणपत्र मिळेपर्यंत कार्यालयात येऊ नये, असे सांगण्यात आले होते.
कार्यालयातून आलेला मेल चुकीचा असल्याचे जाहीर करावे, असे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे. त्यांना पुन्हा कामावर बोलावून या बेकायदेशीर नोटीसमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी, असे त्यामध्ये म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.