आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona India; Arogya Setu App; No Security Breach In Aarogya Setu App, Govt Assures After Ethical Hacker Raises Privacy Concerns

आरोग्य सेतू अॅप:इथिकल हॅकरने 9 कोटी यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात असल्याचे सांगितले; सरकारचा दावा- खासगी माहिती सुरक्षित, चितां करण्याची गरज नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य सेतू अॅपवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या हॅकरनेच यापूर्वी आधारच्या सिस्टीमवर प्रश्न उपस्थित केले होते

आरोग्य सेतू अॅपमध्ये डेटा सेफ्टीच्या चिंतेमध्ये सरकारने बुधवारी आपले स्पष्टीकरण दिले. आरोग्य सेतू टीमने म्हटले की, कोणत्याही यूजरची खासगी माहिती लीक होण्याचा धोका नाही. आम्ही सतत सिस्टीमला अपग्रेड आणि टेस्टिंग करत आहोत. सरकारला हे स्पष्टीकरण यासाठी द्यावे लागले, कारण आधार सिस्टीममध्ये काहीतरी फॉल्ट असल्याचे सांगणाऱ्या फ्रांसच्या इथिकल हॅकर (सायबर एक्सपर्ट) एलिअट एल्डर्सननेच मंगळवारी आरोग्य सेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने म्हटले की, आम्ही हॅकरशी चर्चा केली आहे, चिंता करण्याची काही गरज नाही.

इथिकल हॅकरने काय म्हटले?

त्याने ट्विटरवरुन आरोग्य सेतू टीमला म्हटले होते की, 'तुमच्या अॅपमध्ये सिक्योरिटीचा इश्यू आहे. 9 कोटी यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात आहे. तुम्ही माझ्याशी खासगीत चर्चा करा?' यादरम्यान हॅकरने राहुल गांधींना बरोबर असल्याचे सांगितले. कारण, काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी आरोग्य सेतू अॅपमध्ये डेटासंबंधी प्रश्न उपस्थित केले होते.

सरकारने काय म्हटले ?

आरोग्य सेतू अॅपबाबत एका अथिकल हॅकरने आम्हाला अलर्ट केले होते. आम्ही त्याच्याशी दोन मुद्द्यांवर चर्चा केली आहे. इश्यू: अॅप काही वेळा यूजरची लोकेशन फेच करत आहे. उत्तर: अॅपचे डिझाइन असेच आहे. याबाबत प्रायव्हसी पॉलिसीमध्ये डिटेल सांगण्यात आली आहे. सर्वांच्या फायद्यासाठी याला यूज केले जात आहे. यूजरची लोकेशन सर्वरवर इनक्रिप्टेड आणि सुरक्षित आहे. इश्यू: यूजर आपले रेडियस आणि लॅटीट्यूड-लॉन्गिट्यूड बदलून होम स्क्रीनवर कोरोनाचे आकडे पाहू शकतो. उत्तर: रेडियसचे पॅरामीटर फिक्स आहेत. 500 मीटर, एक किलोमीटर, दोन किलोमीटर, पाच किलोमीटर आणि 10 किलोमीटरच्या स्टँडर्ड पॅरामीटर आहेत. यूजर एकापेक्षा जास्त लोकेशनचा डेटा पाहण्यासाठी लॅटीट्यूड-लॉन्जिट्यूड बदलू शकतो. सर्व लोकेशनची माहिती सार्वजनिक आहे. यामुळे कोण्याच्या खासगी माहितीवर परिणाम होणार नाही.

हॅकर सरकारच्या उत्तराने नाखुश

त्याने आरोग्य सेतू टीमच्या उत्तरावर म्हटले की, मी उद्या परत तुमच्याशी चर्चा करतो. पण, त्याने अॅपच्या लोकेशनच्या रेफरेंसच्या दोन तासानंतर सरकारला विचारले. तुम्हाला ट्राएंगुलेशन माहिती आहे का?

बातम्या आणखी आहेत...