आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:देशातील संक्रमितांचा आकडा 9.59 लाखांवर; बुधवारी 22,430 पेक्षा जास्त रुग्णांची वाढ तर 550 मृत्यू

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील संक्रमितांचा आकडा 9 लाख 59 हजार 993 झाला आहे. देशात आतापर्यंत 6 लाख 09 हजार 831 रुग्ण ठीक झाले, तर 3 लाख 24 हजार 908 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, आतापर्यंत देशात 24 हजार 865 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. बुधवारी देशात 22,430 रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी मंगळवारी देशात रेकॉर्डब्रेक 29 हजार 917 रुग्ण वाढले. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

दरम्यान, बिहारमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. बुधवारी बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल संक्रमित झाले. यासोबतच दो दिवसात भाजप ऑफिसमधील 25 लोक पॉझिटिव्ह आढळले. संजय यांची पत्नी मंजू चौधरी आणि आईची रिपोर्टही पॉझिटिव्ह आली आहे.  सोबतच, राजभवन परिसरातील 20 जण संक्रमित झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...