आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona India | Marathi News | More Than One Lakh Patients In The Country For The Eighth Day In A Row In The Third Wave Of Corona; Active Patients Cross 12 Lakhs

कोरोनाची तिसरी लाट:देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सलग आठव्या दिवशी एका लाखांपेक्षा जास्त रुग्ण; सक्रिय रुग्ण 12 लाखांच्या पार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. गुरुवारी सलग आठव्या दिवशी एक लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजेच्या रिपोर्टनुसार, देशात आज 1 लाख 12 हजार 967 नव्या कोरोना रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे.

तर दिलासादायक म्हणजे 20 हजार 56 जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर आज दिवसभरात 183 जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 11.09 लाख वरुन आता 12.05 लाख इतका झाला आहे.

याअगोदर बुधवारी देशातील सक्रिय रुग्णांचा प्रमाण अवघ्या सात महिन्यांनंतर 11 लाखांच्या पार गेली होती. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर नऊ जून रोजी देशात 11 लाख 67 हजार 952 सक्रिय रुग्ण होते. अवघ्या पाच दिवसात रुग्ण 5 लाखांवरुन 11 लाख झाले आहेत.

देशात आतापर्यंत सुमारे 3.64 कोटी जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातील 3.47 कोटी जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 4 लाख 85 हजार 218 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज कोरोनाची आकडेवारीत घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे. आज दिवसभरात मुंबई 13 हजार 702 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर बुधवारी 16 हजार 420 रुग्ण आढळले होते, त्यामुळे कालच्या तुलनेत आज मुंबईत कोरोनाचा आलेख काही प्रमाणात घसरतांना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 20 हजार 849 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबई 95 हजार 123 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर दिल्लीत आज 28 हजार 867 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासात 31 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे 22 हजार 121 जण कोरोना मुक्त झाले आहेत. राजधानी दिल्लीत सध्या 94 हजार 160 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...