आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Virus India | Mumbai Delhi Coronavirus News | Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

कोरोना देशात:देशातील कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख पार, फक्त 5 दिवसांत 1 लाख रुग्ण वाढले; देशातील रिकव्हरी रेट 59.43%

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोनामुळे आतापर्यंत 17 हजार 410 मृत्यू, महाराष्ट्रात सर्वाधिक 7,855 रुग्णांचा बळी

देशातील कोरोनग्रस्तांचा आकडा बुधवारी 6 लाख पार झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 17 हजार 410 वर पोहोचली आहे. 26 जून रोजी संसर्गाची प्रकरणे 5 लाखांवर गेली होती, फक्त 5 दिवसात एक लाख प्रकरणे वाढली आहेत. देशात एक लाख रुग्ण वाढण्याची ही सर्वाधिक गती आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील रिकव्हरी रेट वाढून 59.43% झाला आहे.

हरियाणा सरकारने 27 जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुधवारी राज्याच्या शिक्षण संचालनालयाने आदेश जारी केले. जारी केलेल्या आदेशानुसार 1 जुलै ते 26 जुलैपर्यंत उन्हाळ्याची सुटी घोषित आहे. यानंतर शाळा सुरू केल्या जातील. 

मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये बुधवारी रात्रीपासून कलम 144 लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलिस कमिश्नरांनी सांगितल्यानुसार, कंटेनमेंट झोनमध्ये एकापेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असेल. हा नियम रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत असेल.

यापूर्वी मंगळवारी 18 हजार 256 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 12 हजार 565 रुग्ण ठीक झाले. यादरम्यान, 506 रुग्णांचा संक्रमणामुळे मृत्यूही झाला आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनाची परिस्थिती भयावहः झाली आहे. याच पार्श्वभूमिवर मुंबईतील गणेश मंडळांनी यावर्षी गणेशोस्तव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध लालाबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यावर्षी उत्सव आणि मोठे कार्यक्रम न करता, 11 दिवस ब्लड आणि प्लाज्मा डोनेशन कँप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी 22 ऑगस्टपासून गणेशोस्तव सुरू होत आहे.

गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, एका भाजप आमदाराची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रात्री 11.30 वाजता आरोग्य सेतू अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. अॅपकडूनच ट्वीटद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. काही युजर्सना लॉग इन करण्यात अडचण येत होती, पण रात्री 12.10 वाजता अॅपने सुरळीतपणे काम करणे सुरू केले.

0