आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona India : PM Warns CM, 150 Percent Patients Increase In 70 Days In 70 Districts, Prevent New Corona From Spreading To Villages

दुसरी लाट रोखा:​​​​​​​पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, 70 जिल्ह्यांत 15 दिवसांत 150% वाढले नवे रुग्ण, कोरोनाला गावांपर्यंत पसरण्यापासून रोखावे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवा विक्रम : देशभरात 35,482 नवे रुग्ण, एकट्या महाराष्ट्राचे 23,179 रुग्ण

देशात कोरोनाच्या स्फोटक स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. बुधवारी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हीसीद्वारे चर्चा केली. ते म्हणाले, १ ते १५ मार्चदरम्यान १६ राज्यांतील ७० जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण १५०% पेक्षा अधिक वाढले आहेत. कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखली नाही तर मोठ्या अडचणी येतील. आपल्याला त्वरित व निर्णायक पावले उचलावी लागतील. मोदींनी इशारा दिला की, आता टियर २ व टियर ३ शहरांतही कोरोना वाढला आहे. तो गावांपर्यंत पसरला तर संसाधनांची कमतरता पडू शकते. ते म्हणाले, महाराष्ट्र व मध्य प्रदेशात पॉझिटिव्हिटी रेट अचानक वाढला आहे. काही राज्यांत रॅपिड अँटिजन टेस्ट जास्त होत आहेत. तेथे आरटीपीसीआर टेस्ट व्हाव्यात. काेरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण इथपर्यंत आलो आहोत, त्यातून आलेला आत्मविश्वास हा अति आत्मविश्वासात बदलू नका.

  • बुधवारी देशात ३५,४८२ नवे रुग्ण आढळले. हा ५ डिसेंबरनंतरचा सर्वात मोठा आकडा आहे.
  • ४५ वर्षांवरील सर्वच लोकांच्या लसीकरणाची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पीएमओला पत्र पाठवून केली आहे.

महाराष्ट्राच्या १३ जिल्ह्यांतील रुग्ण ३८५ टक्क्यांनी वाढले

  • महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. यात सर्वच विभागांतील जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात लाेक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसते.
  • नंदुरबार 224%, बीड 219%, धुळे 169%, नाशिक 157%, जळगाव 147%, भंडारा 140%, नागपूर 122%, चंद्रपूर 95%, अहमदनगर 72%, बुलडाणा 65%, औरंगाबाद 58% आणि अकोला 20%.

मध्य प्रदेश... टेस्ट २% वाढल्या, रुग्ण २५९% पर्यंत वाढलेत
राज्यात १० फेब्रुवारीनंतर अचानक रुग्णांत वाढ होऊ लागली होती. तेव्हापासून राज्यात २५९% रुग्ण वाढले आहेत. तुुलनेत चाचण्या फक्त २% वाढवण्यात आल्या. इंदूर-भोपाळमध्ये नाइट कर्फ्यू सुरू आहे. राज्यातील १० पेक्षा जास्त शहरांत कोरोनाचे रुग्ण अचानकपणे वाढले आहेत. मध्य प्रदेशात संसर्गाचा दर वाढून ४.३% झाला आहे. राज्यातील ५४% रुग्ण एकट्या इंदूर आणि भोपाळमध्ये आढळत आहेत.

महाराष्ट्र... फेब्रुवारीनंतर ४९७% रुग्णवाढ, चाचण्या वाढल्या नाहीत
राज्यात २ फेब्रुवारीनंतर रुग्ण वाढू लागले होते. तेव्हापासून राज्यात ४९७% रुग्ण वाढले, चाचण्या मात्र ७१ टक्केच वाढल्या. नागपुरात लॉकडाऊन व पुणे, अकोल्यासह अनेक शहरांत नाइट कर्फ्यू सुरू आहे. मात्र रुग्णवाढ थांबलेली नाही. तज्ज्ञांनुसार, संसर्गग्रस्त जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्टिंगचा वेग वाढवला तर महामारी आटोक्यात येऊ शकते. सध्या राज्यात संसर्ग दरही १६ टक्क्यांपर्यंत पोहाेचला आहे.

भास्कर स्कॅन : कोरोना वाढवण्यात या २ राज्यांची अधिक भागीदारी, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच रुग्ण वाढत होते
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात यंदा फेब्रुवारीनंतरच्या दीड महिन्यात ६२९% पर्यंत नवे रुग्ण वाढले आहेत. त्या तुलनेत चाचण्या वाढलेल्या नाहीत. तसेच सतर्कतेच्या नावानेही बाेंबाबोंब आहे.

बातम्या आणखी आहेत...