आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Infected Mother Gives Birth To Twins In Mehsana; One Baby Is Positive And The Other Is Negative,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्मिळ प्रकरण:कोरोना संक्रमित आईने दिला जुळ्या बाळांना जन्म; एक बाळ पॉझिटिव्ह तर दुसरे निगेटिव्ह

महेसाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुळ्यांपैकी मुलगा पॉझिटिव्ह आणि मुलगी निगेटिव्ह

अनेकदा कोरोना संक्रमित आईकडून मुलांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू, वडनगरच्या मोलीपुरात चकीत करणारी घटना घडली आहे. येथील एका कोरोनाबाधित महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली, तर दुसरा निगटिव्ह आला आहे. या घटनेमुळे डॉक्टरदेखील हैराण झाले आहेत. गुजरातमध्ये याप्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे.

रिपोर्टमुळे आरोग्य विभाग चकीत

मोलीपुरची कोरोना संक्रमित हसुमति बेन परमारने शनिवारी वडनगरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. आई कोरोना संक्रमित असल्यामुळे दोन्ही बाळांचे सँपल चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले. सोमवारी रिपोर्ट आल्यावर डॉक्टरदेखील हैराण होते. कारण, जुळ्यांपैकी मुलाची रिपोर्ट पॉझिटिव्ह होती, तर मुलीची निगेटीव्ह होती. यानंतर मुलाचे सँपल परत एकदा चाचणी करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.

याबाबत वडनगर मेडिकल कॉलेजचे सुपरिटेंडेंट एचडी पालेकर म्हणाले की, रिपोर्टमध्ये काहीतरी चुक झालेली असू शकतो. बाळांना ब्रेस्ट फीडिंगदेखील केली नव्हती. दोन्ही बाळांना सोबतच एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. अशा परिस्थितीत दोघांच्या रिपोर्ट वेगवेगळ्या येऊ शकत नाहीत. त्यामुळे दोन दिवसानंतर परत एकदा त्यांची चाचणी करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...