आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Infection Can Spread Not Only Through The Air But Also Through Sewage Water

अहवाल:हवाच नव्हे, गटारातील पाण्यातूनही पसरू शकतो कोरोनाचा संसर्ग

रितेश शुक्ल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सांडपाणी व्यवस्थापन नसलेल्या देशांत कोरोनाचा सामना करणे अवघड
  • भास्करने स्वित्झर्लंडच्या तज्ज्ञांकडून समजून घेतले यामागील तर्क

कोरोना विषाणू कसा पसरतो याबाबत जगभरात वेगवेगळे दावे केले जात आहेत किंवा अनेक प्रकारचे सिद्धांत मांडले जात आहेत. असेच काहीसे हा विषाणू हवेतून पसरत असल्याबद्दल सांगितले जात आहे. मात्र आणखी एका नव्या संशोधनानुसार आपल्या घरातून निघणारे सांडपाणी किंवा गटारातील पाण्याद्वारेही कोरोना पसरू शकतो.

म्हणजे जर खोकला, शिंकणे व बोलल्याने कोरोना पसरू शकतो तर गटाराचे पाणी येणारी नदी आणि तलावाच्या संपर्कात आल्याने कोरोना पसरणार नाही का? याचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही पाण्यापासून होणाऱ्या रोगराईच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांशी संपर्क साधला. यातील एक आहेत स्वित्झर्लंडच्या केंद्रीय जल विज्ञान संस्थेच्या (ईएडब्लूएजी) शहरी जल व्यवस्थापन विभागाचे गटनेते आणि वेस्ट वॉटर अॅपिडेमियोलॉजिस्ट डॉ. क्रिस्टॉफ ओर्ट. भास्करने त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यामागील तर्क समजून घेण्याचे प्रयत्न केले. डॉ. ओर्ट यांनी सांगितले की, गटारातील पाणी खोटे बोलत नाही. कारण, तुम्ही ज्या गोष्टीचे सेवन करता त्याचे अवशेष तुमच्या शरीरातून निघणाऱ्या मलमूत्रात दिसतात. कोविड सांडपाण्यातूनही पसरू शकतो का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, गटारातील पाणी प्रक्रियेशिवाय राहू शकत नाही. आम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही की गटारीतील पाण्याने संसर्ग पसरू शकतो.

ज्या देशांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची पुरेशी सोय आहे तेथे वेस्ट वॉटर अॅपिडेमियोलॉजीचा वापर कोरोनाची सामूहिक चाचणीसाठी केला जाऊ शकतो. म्हणजे कोणत्या भागात कोरोना संसर्ग वाढू शकतो हे समजेल. त्यातून काळजी घेता येईल. मात्र जेथे सांडपाणी व्यवस्थापन कमजोर आहे तेथे सांडपाण्यात कोरोना असल्यास तो पसरू शकतो का याचा शोध घेता येईल.

भारताची स्थिती दयनीय... फक्त चार शहरांतच १००% सांडपाणी प्रक्रिया

पर्यावरण मंत्रालयाच्या ईएनव्हीआयएस केंद्राच्या एप्रिल २०२१ च्या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतात रोज ७२,३६८ एमएलडी सांडपाणी निघते. प्रक्रिया करण्याची एकूण क्षमता फक्त ३१८४१ एमएलडी आहे, तर ऑपरेशनल क्षमता केवळ २६,८६९ एमएलडी आहे. म्हणजे सुमारे ६३% सांडपाणी प्रक्रियेशिवाय वाहत असते. मोठ्या प्रमाणात ते पाण्याच्या स्रोतातही मिसळते.

स्वित्झर्लंड : पहिला रुग्ण आढळताच सांडपाणी चाचणी केली सुरू
डॉ. ओर्ट सांगतात, गेल्या वर्षी फेब्रुवारीत स्वित्झर्लंडमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आम्ही सांडपाणी चाचणी सुरू केली होती. अमेरिका, नेदरलँडसारखे इतर देशही या प्रक्रियेचा वापर करत आहेत याचे समाधान आहे.

बातम्या आणखी आहेत...