आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडवर कोरोनाचे सावट:'रामसेतू' चित्रपटातील 45 ज्युनियर आर्टिस्टना कोरोनाची लागण; चित्रपटाचे चित्रीकरण रद्द, अभिनेता अक्षय कुमार रुग्णालयात दाखल

नई दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी लवकरच अ‍ॅक्शनमध्ये परत येईल, असे अक्षय म्हणाला आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. अलीकडेच त्याने आपल्या आगामी 'रामसेतू' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाल्याने सुरू असलेल्या चित्रपटाचे काम थांबवावे लागले आहे. यातच आता या चित्रपटाच्या सेटवरील तब्बल 45 लोक कोरानाबाधीत झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, ते सर्वजण सध्या होम क्वारंटाइन आहेत. तर दुसरीकडे अक्षय कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अक्षय कुमार रुग्णालयात दाखल

कोरोनाची लागण झाल्यानंतर अक्षयने स्वतःला घरीच क्वारंटाइन केले होते. मात्र आता अक्षयची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवईस्थित हीरानंदानी रुग्णालयात अक्षयवर उपचार सुरु आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षयने आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. अक्षयने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद, तुमच्या प्रार्थनांचा प्रभाव दिसत आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून डाक्टरांच्या देखरेखीखाली राहण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. आशा करतो की लवकर घरी परतेन, काळजी घ्या.'

आता पंधरा दिवसांनी सुरु होणार 'रामसेतू' चित्रपटाचे चित्रीकरण
सुत्रांच्या माहितीनुसार, अभिनेता अक्षय कुमार आणि चित्रपटाची टीममधील 45 जण पॉझिटिव्ह आल्याने सध्या चित्रपटाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण पंधरा दिवसांनी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती निर्मात्याने दिली.

अक्षयने स्वतः दिली होती कोरोनाची लागण झाल्याची माहिती

रविवारी अक्षय कुमारला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले होतं. अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले होते. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये अक्षय म्हणाला होता,'मी सर्वांना सांगू इच्छितो की आज सकाळी माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी मी विनंती करतो की त्यांनी स्वत: कोरोना चाचणी करून घ्या. लवकरच अ‍ॅक्शनमध्ये परत येईल.'

सहा दिवसांपूर्वीच चित्रपटातील लूक केला होता शेअर

कोरोनाची लागण होण्यापूर्वीपर्यंत अक्षय मुंबईत ‘राम सेतू’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होता. सहा दिवसांपूर्वीच त्याने चित्रपटातील आपला लूक शेअर केला होता. सोबत तो म्हणाला होता, 'राम सेतूच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या मी चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. लुक कसा वाटला?, तुमच्या सूचना माझ्यासाठी नेहमीच खास असतात,' अशा आशयाची पोस्ट अक्षयने शेअर केली होती.

बातम्या आणखी आहेत...