आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Infection Of One To 5 People In Maharashtra, Up To Three In Gujarat Madhya Pradesh

कोरोना:महाराष्ट्रात एकाकडून 5 जणांना संसर्ग, गुजरात-मध्य प्रदेशात संसर्गाचे प्रमाण तीनपर्यंत; औरंगाबादेत एक दिवसात उच्चांकी 20 मृत्यू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी कोरोना वाढत असतानाही देशात संसर्गाचा कमाल दर दीड ते अडीच होता

देशात काेराेनाचा ‘R-फॅक्टर’ही वाढत आहे. ‘R-फॅक्टर’ म्हणजे व्हायरसची पुनरुत्पत्ती, ज्यामुळे एखादी बाधित व्यक्ती पुढील काही लोकांपर्यंत त्यांचा संसर्ग पसरवते. विश्लेषकांनुसार ‘R-फॅक्टर’ महाराष्ट्रातच सर्वाधिक वाढत आहे. राज्यात एकाकडून तब्बल ५ जणांना संसर्ग होत असल्याची शंका आहे. गुजरात व मध्य प्रदेशात हा आकडा ३ आहे. तथापि, संपूर्ण देशात ही सरासरी एक ते दीडदरम्यान कायम आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्गाचादरम्यानही तो देशात कमाल दीड ते अडीच दरम्यानच होता.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्ग देशभर काहीसा नियंत्रणात असल्याचे दिसत होता. एकूण रुग्णांपैकी केवळ १.३२% सक्रिय रुग्ण होते. आता ते वाढून २.५% झाले आहेत. आयसीएमआरच्या कोरोना टास्क फोर्सचे अॉपरेशन व रिसर्च ग्रुपचे चेअरमन प्रो. नरेंद्र अरोडांनुसार महाराष्ट्र, पंजाब व केरळात कोरोनाचा ‘R-फॅक्टर’ पाचच्या जवळ पोहोचत आहे. यामुळे हा एकाकडून पाच, ५ कडून १२५ लोकांना कोरोना होतो. कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन न केल्यामुळे संसर्ग वाढत आहे.

औरंगाबादेत एक दिवसात उच्चांकी 20 मृत्यू
औरंगाबाद | शनिवारी औरंगाबादेत बळीचा उच्चांक झाला. दिवसभरात २० जणांनी प्राण गमावले. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या १४०८ झाली. १४ जणांचा घाटी रुग्णालयात तर खासगी रुग्णालयात ६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पैठण, कन्नड, लासूर स्टेशन येथील प्रत्येकी एक आणि सिल्लोडच्या दोन नागरिकांचा समावेश आहे. एकूण २० जणांमध्ये ११ पुरुष तर ११ महिला आहेत. १७ मार्च रोजी १८ तर १८ मार्च रोजी १६ जणांचा मृत्यू झाला. १९ रोजी हा आकडा ५वर आल्याने तणाव काहीसा निवळला होता. तो शनिवारी पुन्हा रेकॉर्डब्रेक बळी गेल्याने वाढला.

१२ दिवसांत रुग्ण दुप्पट
शनिवारी गेल्या २४ तासांत ३७,६९५ नवे रुग्ण आढळले. हा १११ दिवसांतील उच्चांक आहे. यापूर्वी शुक्रवारी ३९,६८७ नवे रुग्ण सापडले होते. देशात दर १२ दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा दर ६२ दिवस होता. भयंकर स्थिती गतवर्षी १६ सप्टेंबरला होती. तेव्हाही डबलिंग रेट ८७ दिवसांचा होता.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना काेरोना, मुख्यमंत्री क्वॉरंटाइन
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची काेरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनीच सोशल मीडियावर याची माहिती दिली. यानंतर त्यांचे वडील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे क्वॉरंटाइन झाल्याची माहिती आहे.
- शनिवारी राज्यात २७,१२६ नवीन रुग्ण, उच्चांकी ९२ मृत्यू. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ९१ हजार.
- विदर्भात ५२ रुग्णांचा मृत्यू, तर ६६३९ नवे रुग्ण. मृतांत पूर्व विदर्भातील ३६, तर प. विदर्भातील १६.
- शनिवारी औरंगाबाद वगळता मराठवाड्यात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४२६२ नवे रुग्ण सापडले.

बातम्या आणखी आहेत...