आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात मास्क न घालणे आणि सहा फूट अंतराच्या नियमांचे कठोरपणे पालन न करण्याचा परिणाम समोर येत आहे. रविवारी चिंता वाढवणारे दोन आकडे समोर आले. संसर्गाचा दर गेल्या वर्षाच्या डिसेंबरच्या स्तरावर (१.८५%) पोहोचला आहे. तो काही दिवसांपासून १.५५% च्या जवळपास होता. दुसरे म्हणजे गेल्या २४ तासांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा (रुग्णालयात असलेल्या) आकडा २.१० लाखांवर गेला आहे. १९ जानेवारीनंतरचा (१.८२%) हा सर्वात मोठा आकडा आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढवण्यात महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबचा वाटा ७६.९३% आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे अडीच महिन्यांनंतर गेल्या २४ तासांत देशात २५,३२० नवे रुग्ण आढळले. त्यापैकी १६,६२० रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
पंजाब-महाराष्ट्र या दोन राज्यांत सर्वाधिक ६७% कोरोना रुग्ण
देशात कोरोनाचे ६७% रुग्ण महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांतील आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १६,६२० तर पंजाबमध्ये १,५१५ नवे रुग्ण आढळले. पंजाबमध्ये या वर्षातील एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. पंजाबचे नोडल अधिकारी डॉ. राजेश भास्कर यांनी सांगितले की, राज्यात एवढे रुग्ण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आढळत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.