आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनिया गांधींना कोरोना:अंगात तापाची सौम्य लक्षणे, बुधवारी सेवादलाच्या कार्यक्रमात झाल्या होत्या सहभागी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यात तापाची सौम्य लक्षणे दिसून आलीत. काँग्रेस प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, सोनिया बुधवारी सेवादलाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्या त्यात ज्या नेत्यांना भेटल्या, त्या नेत्यांतही कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्या संपर्कात आल्यामुळेच सोनिया पॉझिटीव्ह आढळल्या. त्या सध्या विलगीकरणात असून, कोरोना नियमांचे पालन करत आहेत.

8 जून रोजी ईडीपुढे होणार हजर

नॅश्नल हेराल्ड प्रकरणी सोनिया येत्या 8 तारखेला ईडीपुढे हजर होणार आहेत. ईडीने यासाठी त्यांना समंस बजावला आहे. आता त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सुरजेवालांनी त्या बऱ्या झाल्यानंतर चौकशीला सामोरे जातील असे स्पष्ट केले आहे. ईडीने या प्रकरणी बुधवारी सोनिया व राहुल गांधींना नोटीस बजावली होती. सोनिया-राहुल यांच्यावर हेराल्ड प्रकरणात 55 कोटी रुपयांची लबाडी केल्याचा आरोप आहे.

नॅश्नल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी जामिनावर आहेत. 2014 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने प्रथमच त्यांना समंस बजावला आहे.
नॅश्नल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी जामिनावर आहेत. 2014 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने प्रथमच त्यांना समंस बजावला आहे.

प्रियंका गांधी लखनऊहून दिल्लीत परतल्या

लखनऊ काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या प्रियंका गांधी गुरुवारी अचानक दिल्लीला परतल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनियांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रियंकाही विलगीकरणात जातील. काँग्रेसच्या अन्य नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच नेत्यांना टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

दिल्लीत 24 तासांत 368 नवे रुग्ण

दिल्लीत मागील 24 तासांत 368 नवे रुग्ण आढळलेत. त्यानंतर सक्रिय रुग्णांचा आकडा 1567 वर पोहोचला आहे. तर 404 रुग्ण बरे झालेत. दिल्लीचा पॉझिटीव्हीटी रेट 1.74 वर पोहोचला आहे. दिल्लीत एका दिवसात 21, 147 चाचण्या करण्यात आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...