आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Infection To Former President Pranab Mukherjee; Successful Brain Surgery, Serious Condition

नवी दिल्ली:माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना कोरोनाचा संसर्ग; मेंदूवर शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती गंभीर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ८४ वर्षीय प्रणवदांनीच याची माहिती दिली. मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्यामुळे ते लष्करी रुग्णालयात गेले होते. शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या तपासणीत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले. तपासणीनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

प्रणवदांची प्रकृती गंभीर आहे, परंतु सर्व महत्त्वाचे अवयव उत्तम काम करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. शस्त्रक्रियेपूर्वी प्रणवदांनी टि्वट केले होते. रुग्णालयात चेकअपसाठी गेलो होतो. तपासणी केल्यानंतर कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. गेल्या आठवडाभरात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून स्वत:च अलगीकरणात जावे, असे या टि्वटमध्येत त्यांनी नमूद केले होते.

बातम्या आणखी आहेत...