आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Is An Excuse, The Modi Government Wants To Make Government Offices Staff Less : Rahul Gandhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल गांधी म्हणाले:कोरोना तर बहाणा आहे, मोदी सरकारला सरकारी कार्यालये कर्मचारीमुक्त करायची आहेत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत एक व्हिडीओ मालिकाच सुरु केली आहे

काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. यावेळी त्यांनी सरकारी कार्यालयातील नव्या नोकर भरती वरील स्थगितीवर बोलताना मोदी सरकारला सरकारी कार्यालये कायम वेतनावरील कर्मचारी मुक्त करायचे असल्याचा आरोप केला. कोरोना तर निमित्त आहे. मोदी सरकारला सरकारी कार्यालये कायम वेतनावरील कर्मचारी मुक्त करायची असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

याबाबत राहुल गांधी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, "मोदी सरकारचा विचार ‘कमीत कमी शासन आणि सर्वाधिक खासगीकरण’ असा आहे. कोरोना मात्र निमित्त आहे. मोदी सरकारला सरकारी कार्यालयांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांपासून मुक्त करायचे आहे. त्यांना युवकांचे भविष्य खराब करुन आपल्या मित्रांनाच पुढे न्यायचे आहे."

दरम्यान मोदी सरकारने नोकर भरतीच्या परीक्षांचे निकाल आणि तरुणांच्या प्रश्नांवरील उपाय द्यावेत, अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

दुसऱ्या एका ट्विट मध्ये राहुल म्हणतात, "देशातील 12 कोटी रोजगार गेले आहेत. 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था दिसेनासी झाली आहे. सामान्य नागरिकांचे उत्पन्न गायब आहे, देशाचा विकास आणि सुरक्षा देखील गायब झाली आहे आणि प्रश्न विचारले तर उत्तरे गायब आहेत," असे सांगत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी मागील काही दिवसांपासून मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्ला चढवत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका करत एक व्हिडीओ मालिकाच सुरु केली. यात त्यांनी नोट बंदी, जीएसटी आणि लॉकडाऊन अशा अनेक निर्णयांवर निशाणा साधला आहे.