आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Is Now A Common Flu like Flu, More Or Less Prevalent For Up To 10 Years; This Is Natural Vaccination |marathi News

भास्कर एक्स्पर्ट:कोरोना आता सर्दीसारखा सामान्य फ्लू, 10 वर्षांपर्यंत कमी-जास्त प्रमाण राहील; हे तर नैसर्गिक लसीकरण

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या २४ तासांत देशात १३ हजार नवे कोरोना रुग्ण आढळल्याने पुन्हा चौथी लाट येणार का असा प्रश्न आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे शास्त्रज्ञ डॉ. राम एस. उपाध्याय यांच्यानुसार, कोरोना आता सर्दीसारखा सामान्य फ्लू आहे. तो १० वर्षे संपणार नाही. रुग्ण वाढत जातील तसतसे नैसर्गिक लसीकरण चालू राहील. हेच खरे कोरोना कवच आहे.

लॉकडाऊनची आवश्यकता नाही, पण मास्क वापरावा लागेल
प्रत्येक ४-६ महिन्यांनी प्रकरणे का वाढू लागतात?
हा विषाणू पूर्वी प्राण्यांच्या शरीरात इजा न करता राहत असे. आता मानवी शरीर मिळाले. मानवी शरीरात राहण्यासाठी तो स्वतःला विकसित करत आहे. त्यामुळे अल्फा, डेल्टा, ओमिक्रॉनसारखे प्रकार समोर येत आहेत.

रुग्णवाढ धोकेदायक आहे का ?
संसर्गात वाढ झाली असली तरी घाबरण्यासारखे काही नाही. पण, आधीच काही आजार आहे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. नुकसान होणार नाही; परंतु इतर रोगांचा प्रभाव वाढू शकतो.

ही स्थिती कुठपर्यंत राहील?
१० वर्षांपर्यंत विषाणूचे वेगवेगळे प्रकार समोर येतील पण, सर्दी- खोकल्यासारखे.

लॉकडाऊनसारखी स्थिती परत येऊ शकेल?
आपण मास्क घालण्यास संकोच करू नये. पण, लॉकडाऊनची अजिबात शक्यता नाही.

नव्या लसीकरणाची गरज भासेल का ?
नाही. विषाणूचे येणे-जाणे हे एक प्रकारचे नैसर्गिक लसीकरण आहे, जे आपल्याला दर सहा महिन्यांनी-वर्षांनी मिळत राहील. यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होईल.

बातम्या आणखी आहेत...