आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Kills 93,000 People In The Country, 28 Million Die Every Year From Heart Disease; India Has The Highest Number Of Deaths From Heart Disease In The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भयावह:कोरोनामुळे देशात 93 हजार लोकांचा मृत्यू, हृदयरोगाने दरवर्षी 28 लाख मृत; भारतासह जगात हृदयरोगांने मरण्याचे प्रमाण सर्वाधिक

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सुमारे 5.45 कोटी हृदयरुग्ण, कोरोना रुग्णांची संख्या 590 लाखांहून जास्त

जगभरात २०२० मध्ये कोरोना संसर्ग हा सर्वात घातक मानला जात आहे. मात्र, दुसरीकडे जगात इतर साधारण रोग असे अाहेत ज्यात अनेक रुग्णांच्या मृत्यूची संख्या कोरोनापेक्षा कित्येक पट अधिक आहे. भारतासह जगभरात वेगवेगळ्या रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पाहता यात हृदयरोगामुळे होणारे मृत्यू अधिक आहेत. भारतात कोरोनामुळे ३० जानेवारीनंतर आठ महिन्यांत ९३ हजारांहून अध्िाक मृत्यू झाले तर ५९ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला. दुसरीकडे एकट्या हृदयरोगांमुळे देशात दरवर्षी २८ लाख लोकांचा मृत्यू होतात.

जगात एक तृतीयांश मृत्यूंचे कारण हृदयरोग

जगात दरवर्षी जेवढे मृत्यू होतात त्यातील ३१% हृदयरोगांमुळे होतात. भारतात हे प्रमाण २८.१% आहे. वर्ष २०१६ मध्ये जगात १.७९ कोटी लोकांचा हृदयरोगांमुळे मृत्यू झाला. त्याच वर्षी भारतात २८ लाख मृत्यू या रोगामुळे झाले होते. तर, तेव्हा हृदयरोग असलेल्यांची संख्या ५.४५ लाख सांगितली गेली. सर्वात वाईट स्थिती केरळ, पंजाब, तामिळनाडू, आंध्र, हिमाचल, महाराष्ट्र, गोवा आणि प. बंगालमध्ये होती. आयसीएमआर आणि पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या (पीएचएफआय) संशोधनात हे निष्कर्ष काढण्यात आले. ते हेल्थ जर्नल द लॅन्सेटमध्ये २०१८ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर भारताबाबत कोणताही अभ्यास झालेला नाही.गेल्या २५ वर्षांत भारतात हृदयरोग्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले आहे. १९९० मध्ये १३ लाख लोकांचा मृत्यू झाला होता, तर रुग्णांची संख्या २.५७ कोटी नोंदवण्यात आली होती.

> अमेरिका : दरवर्षी ६ लाख ५५ हजार लोकांचा मृत्यू होतो. इतर आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी प्रत्येक चौथा मृत्यू हृदयरोगामुळे होतो.

> इंग्लंड : दरवर्षी १ लाख ७० हजार मृत्यू. सुमारे २७ % मृत्यूंचे कारण हे हृदयरोग हे आहे.

> चीन : दरवर्षी सुमारे ३९ लाख मृत्यू हृदयरोगांमुळे.

> ऑस्ट्रेलिया : दरवर्षी ४१,८०० मृत्यू. एकूण मृत्यूंच्या सुमारे २६%

> फ्रान्स : १.८० लाख मृत्यू. सुमारे २६ % मृत्यू हृदयरोगामुळे.

हृदयरोगामुळे जगातील १६ % मृत्यू एकट्या भारतात, कोरोनात ९.४%

जगात हृदयरोगामुळे जेवढे मृत्यू होतात त्यातील सुमारे १६% भारतात होतात. तर कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंमध्ये भारताचा वाटा सुमारे ९.४% आहे. जगात कोरोना रुग्णांची संख्या ३.२७ कोटींहून अधिक आणि मृत्यूंची संख्या ९.९३ लाखावर गेली आहे. भारतात ७० वर्षांहून कमी वयाच्या ५०%हून अधिक अशा हृदयरोग असलेल्यांचा मृत्यू होता. अमेरिकेसह पाश्चिमात्य राष्ट्रांत हे प्रमाण केवळ २०-२२% आहे.

बातम्या आणखी आहेत...