आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रहस्यमय जग:कोरोनाने 7 लाख विषाणूंच्या शोधाच्या प्रकल्पास दिली चालना, 30 हजार कोटी रुपये खर्च होतील

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मानवाला कोणत्या विषाणूपासून धोका होऊ शकतो याचा शोध घेणार

कोरोना विषाणूच्या प्रकाेपामुळे विषाणूंच्या रहस्यमय जगाचा शोध आणखी व्यापक झाला आहे. गेल्या वर्षी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या मॅरी फायरस्टोन व त्यांच्या सहकाऱ्यांनी गवताळ मैदानात विषाणूच्या ३८८४ नव्या प्रजातींचा शोध लावला होता. तसे पाहता जैववैविध्याच्या दृष्टीने या आकलनास खूप कमी मानले जाते. २०१० मध्ये अमेरिकी सरकारचा प्रकल्प प्रेडिक्टने ९४९ नव्या विषाणूंचा शोध घेतला होता. ते ३५ देशांतील माणसे व एक लाख ६० हजार प्राण्यांच्या उतींच्या नमुन्यात आढळले होते.

जगातील सस्तन प्राण्यांच्या सर्व ७४०० प्रजातींच्या विषाणूंचा शोध घेण्यासाठी हा प्रकल्प आहे. जवळपास १५ लाख विषाणूंचा शोध घेतला जाईल, अशी त्यांना आशा आहे. यातील सात लाख विषाणू मानवात संसर्गाचा प्रसार करतात. दहा वर्षांच्या प्रकल्पावर सुमारे ३० हजार कोटी रुपये खर्च होतील. विशेष म्हणजे आधुनिक काळात विषाणूंमुळे अनेक महामाऱ्या पसरल्या आहेत. यात कोविड-१९, एचआयव्ही/एड्स तसेच १९१८-२० मधील फ्लूचाही समावेश आहे. यात पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त संख्येने लोक मारले गेले आहेत.

समुद्राच्या एक लिटर पाण्यात १०० अब्ज विषाणू
जगभरात अनेक विषाणूंनी खळबळ माजवली आहे. समुद्राच्या पाण्यासंदर्भातील एका संशोधनात विषाणूंच्या दोन लाख वेगळ्या प्रजाती आढळल्या. एका दुसऱ्या संशोधनात दिसून आले की, एक लिटर समुद्राच्या पाण्यात १०० अब्ज विषाणू असू शकतात.