आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Made A Social Distance Between Dwarkadhish And Devotees, On Occasion Of Janmashtami

द्वारकेतून ग्राउंड रिपोर्ट:द्वारकाधीश आणि भक्तांमध्ये सोशल डिस्टेंसिंग, रोज 1 लाख भक्त राहणाऱ्या द्वारकेत आता फक्त शांतता

द्वारका / जिग्नेश कोटेचाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज सकाळी मी द्वारकेच्या मुख्यप्रवेशद्वारातून शहरात दाखल झालो. द्वारकेतील तीनबत्ती चौकातून जगत मंदिराकडे निघालो आसता तीन-चार मिनिटातच द्वारकाधीश मंदिरात पोहोचलो. मंदिराच्या कळसावरील ध्वज दर्शनानेच शांतीचा अनुभव झाला.

खरं तर तीनबत्ती चौकातून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पहिले अर्धा तास लागायचा परंतु आता हे अंतर तीन-चार मिनिटातच पूर्ण झाले कारण रिकामी बाजारपेठ. कोरोनामुळे द्वारकाधीश मंदिर चार दिवस बंद असून संपूर्ण परिसर शांत आहे, कुठेही वर्दळ नाही. यापूर्वी सामान्य दिवसात येथे दररोज 50 हजार ते 1 लाख भक्तांची वर्दळ राहायची.

द्वारकेतील ही शांतता एक ऐतिहासिक घटना
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्माष्टमीसाठी येथे महिनाभरापासूनच तयारी सुरु होते. आठवड्यापासूनच येथे चोवीस तास द्वारकाधीश जयघोष ऐकू येतो. परंतु यावेळी येथील दृश्य खूप वेगळे आहे. जन्माष्टमीला येथे 1 लाखापेक्षा जास्त भक्त पोहोचतात परंतु यावर्षी सर्वत्र शांतता आहे. इतिहासात पहिल्यांदाच असे घडत असावे.

सकाळपासून दुपारपर्यंत दुकानदारांची भवानीही नाही
मंदिराजवळ प्रसादाची भरपूर दुकाने आहेत. त्यापैकीच एक दुकानदार हितेश भाईंनी येथील परिस्थिती सांगितली. ते सांगतात- येथे भक्तांची खूप गर्दी राहायची परंतु आता सकाळपासून दुपार होत आली तरी भवानीसुद्धा झाली नाही. बोटावर मोजण्याइतकेच भक्त येतात आणि काही दुकानदारांनी तर दुकाने बंदच ठेवली आहेत. जन्माष्टमीला बाजारात पाय ठेवायलाही पूर्वी जागा नसायची. आता बाजार पूर्ण ठप्प आहे.

55 हजार लोकसंख्या असलेल्या द्वारकेत 11 कोरोना संक्रमित
द्वारकेची लोकसंख्या जवळपास 55 हजार आहे आणि आतापर्यंत येथे कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी जन्माष्टमीपर्यंत चार दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचा उदरनिर्वाह कोणत्या न कोणत्या प्रकारे मंदिराशी निगडित आहे. संपूर्ण वर्षाच्या कमाईएवढी 50 टक्के कमाई तर जन्माष्टमी काळातच होत होती. परंतु यावर्षी सर्वकाही ठप्प आहे.

येथे येणाऱ्या भक्तांमुळेच घर चालते
एक व्यापारी महेंद्र खक्कर यांनी सांगितले की, द्वारका धार्मिक नागरी असण्यासोबतच पर्यटनस्थळही आहे. येथून इतर ठिकाणी जाण्यापूर्वी लोक द्वारकाधीश दर्शन घेतात. यावेळी जन्माष्टमीला चार दिवस मंदिर बंद असल्यामुळे इतर ठिकाणीही शांतता आहे. आमच्यासारख्या हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह मंदिरात आलेल्या भक्तांमुळेच होतो. आता आम्ही सरकारकडे एखादे आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी करत आहोत, कारण आमच्याकडे आता काहीच शिल्लक नाही.

बातम्या आणखी आहेत...