आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Corona | Marathi News | Corona Mortality Rate Rises To 121 Per Cent In 9 Days; States Should Test RTPCR Instead Of Antigen

13 राज्यांना कोरोना अलर्ट:देशात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढले, गेल्या 9 दिवसात प्रमाण 121 टक्क्यांवर; राज्यांनी अ‍ॅटिजेन ऐवजी RT-PCR चाचणी करावी

नवी दिल्ली2 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावला होता. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. मागील नऊ दिवसांच्या आकडेवारीतून असे समोर येते की, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 121% इतके वाढले आहे. 15 नोव्हेंबरला देशभरात 197 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

त्याच्या आठवड्याभरानंतर 23 नोव्हेंबरला मृत्यूचे प्रमाण वाढून 437 इतका झाला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ञांनी दिला असून, त्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकार सावध झाले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने त्यासंबंधी 13 राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच कोरोना तपासणीची संख्या कमी झाल्याने नाराजी देखील व्यक्त केली आहे.

कर्नाटकमध्ये 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

उत्तराखंडच्या देहरादून फॉरेस्ट रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये 11 IFS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 48 अधिकाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर तिकडे कर्नाटकच्या धारवाड़मधील SDM वैद्यकीय महाविद्यालयात 66 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते.

हॉस्टेलमध्ये 400 विद्यार्थी राहत असून, हॉस्टलचे दोन मजली सिल करण्यात आले आहे. सध्या 300 विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून, आणखी 100 विद्यार्थ्यांचे अहवाल येणे बाकी आहे. धारवाडच्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मागील आठवड्यात हॉस्टलमधील अनेक जण एका कार्यक्रमात गेले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता, त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आले आहे.

बंगालमध्ये रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण अधिकाऱ्यांना

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालसह देशातील अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण सक्रिय होण्याचे प्रमाण वाढत आहे. आरोग्या सचिव राजेश भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, कोरोना तपासणी जर योग्यरित्या केली नाही तर, अनेक जणांना कोरोना होण्याचा धोका अधिक आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून, जास्तीत जास्त कोरोना टेस्ट वाढवण्याची विनंती करण्यात आली आहे.

अ‍ॅटिजेन ऐवजी आरटीपीसीआर तपासणी करा

पश्चिम बंगालमध्ये कोरोना रुग्ण सक्रिय होण्याचा प्रमाण 2.1% इतका असून, मागील चार आठवड्यातील ही उच्चांकी मानल्या जात आहे. त्यात दार्जिलिंग, दक्षिण दिनाजपुर, हावडा, पश्चिम 24 परगना, दक्षिण 24 परगना, जलपाईगुड़ी आणि कोलकत्ताचा समावेश आहे. त्यामुळे या शहरात अॅटीजेन तपासणी न करता आरटीपीसीआर तपासणी करावी. अशा सुचना केंद्राकडून देण्यात आल्या आहे.

या राज्यांना देण्यात आले पत्र

केंद्रीय आरोग्य विभागाने कोरोनाचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पश्चिम बंगाल व्यतिरिक्त गोवा, जम्मू-काश्मीर, केरळ, लद्दाख, महाराष्ट्र, मणिपुर, मेघालय, मिजोरम, नागालँड, पंजाब, राजस्थान आणि सिक्किम या राज्यांना केंद्रीय आरोग्य विभागाकडून पत्र पाठवण्यात आले असून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. केरळात ऑगस्टमध्ये 2.96 लाख कोरोना तपासण्या करण्यात आल्या होत्या. मात्र सध्या कोरोना तपासणीत घट झाली असून केवळ 56 हजार तपासण्या एका महिन्यात केल्या जात आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपेंचा दावा- तिसरी लाट डिसेंबरमध्ये

महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरी लाट ही डिसेंबर महिन्यात येऊ शकते असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. कोरोना तिसरी लाट ही सौम्य प्रकारची असून, त्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचे देखील टोपे म्हणाले आहे. नागरिकांनी गाफिल राहू नये. शासनाने कोरोना संबंधी लादलेल्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी हिरवा कंदिल दिला. पालकांच्या संमतीने राज्यात काही खासगी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आता महापालिका आणि सर्व सरकारी शाळा देखील सुरू होणार आहेत.

ग्रामीण भागात चौथीपर्यंत, शहरी भागांत सातवीपर्यंत

उल्लेखनीय बाब म्हणजे, स्थानिक पातळीवर कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालेली असताना त्या-त्या ठिकाणी चौथीपासून पुढील वर्गांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. काही खासगी इंग्रजी शाळा पालकांच्या मंजुरीने पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत आहेत. तर काही शाळांनी ऑनलाइनच्या माध्यमातून वर्ग घेतले.

आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामीण भागात पहिली ते चौथी पर्यंत आणि शहरी भागांत पहिली ते सातवी पर्यंत शाळा सुरू होणार आहेत. त्या-त्या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय लागू केला असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीमध्ये नेमके काय म्हटले?

 1. शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
 2. शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
 3. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
 4. कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
 5. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरू करावेत.
 6. शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
 7. संबंधित शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
बातम्या आणखी आहेत...