आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली:सामूहिक संसर्गाची आता शंका, बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण आढळू लागले की होतो सामूहिक संसर्ग

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक सामूहिक संसर्ग नाकारता येत नाही : केंद्रीय आरोग्य सचिव

ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत तो पाहता राजधानी दिल्लीत सामूहिक संसर्ग सुरू झाल्याचे मानले जाऊ शकते... दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या या वक्तव्याने सर्वांना धक्का बसला आहे. देशाच्या अनेक भागांत सामूहिक संसर्ग होत असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्रानेही आता हा प्रसार मान्य करावा, असे जैन म्हणाले. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय व आयसीएमआरच सत्य सांगू शकेल, असे ते म्हणाले. यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दै. भास्करशी बोलताना सांगितले की, डब्ल्यूएचओनुसार सामूहिक संसर्गाची कोणतीच व्याख्या नाही. कोणताही देश आपली परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेत असतो. परंतु, देशातील काही भागांत स्थानिक पातळीवर सामूहिक संसर्गाची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, भारतात सध्या सामूहिक संसर्ग नाही.

चाचण्या वाढल्या, रुग्णही वाढले
- दिल्लीत 10 लाख लोकांमागे 1,22,672.3 लोकांच्या चाचण्या.
- संसर्गाचा दर 10% आहे. म्हणजे दर 100 पैकी 10 लोकांत संसर्ग आढळतोय.

नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य डॉ. डीसीएस रेड्डी यांच्याशी थेट संवाद : दिल्लीच्या एक तृतीयांश लोकांत अँटिबॉडी
सामूहिक संसर्ग कधी होतो ?
कुणाला संसर्ग झाला तर तो कुणापासून झाला हे कळत नाही. एखाद्या भागात, शहरात रोज नव्या रुग्णांची संख्या बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक असेल तर तोही सामूहिक संसर्गच आहे. मात्र, अशा संसर्गाची व्याख्या डब्ल्यूएचओने निश्चित केलेली नाही.

दिल्लीत सामूहिक संसर्ग हे कसे मान्य करणार ?
दिल्लीत दुसऱ्या लाटेसारखी स्थिती आहे. सिरो सर्व्हे अहवाल सांगतो की दिल्लीत एक तृतीयांश लोकांत अँटिबॉडी आहेत. या स्थितीत सामूहिक संसर्ग सुरू झाला आहे हे मान्य केले जाऊ शकते.

देशातील आणखी कोणती राज्ये, शहरे सामूहिक संसर्गाच्या विळख्यात असल्याची शंका आहे?
दिल्ली, मुंबई, चेन्नई, इंदूर व अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांत या संसर्गाची शंका आहे.

एकापासून किती लोकांना संसर्ग होऊ शकतो ?
स्पष्ट सूत्र नाही. संसर्ग झालेल्यास विलगीकरणात ठेवले तर याचा प्रसार रोखता येऊ शकतो.

सामूहिक संसर्गापासून बचाव कसा होऊ शकेल ?
आपल्या भागात कोरोना रुग्णांची स्थिती काय आहे याबाबत लोक जागरूक असायला हवेत. म्हणजे कंटेनमेंट झोन व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग काटेकोरपणे पाळावी.

आणखी कोणती काळजी घ्यावी लागेल ?
मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक.

आता पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल ?
अजिबात नाही. लॉकडाऊन परिणामकारक पर्याय नाही. संसर्ग झालेल्यांत लक्षणे नसलेले रुग्ण असतील आणि त्यांना घरातच ठेवले तरी कोरोना संसर्ग वाढतच जाईल. हे तर आणखी धोकादायक आहे.

बातम्या आणखी आहेत...