आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona | Mumbai Delhi Coronavirus News | Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:देशातील रिकव्हरी रेट 51.08%,आतापर्यत देशात 1 लाख 69 हजार 797 रुग्णांची कोरोनावर मात; तमिळनाडूतील 4 जिल्ह्यांत कडक लॉकडाउन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 दिवसांपूर्वी दररोज सुमारे 1.25 लाख चाचण्या, आता 1.50 लाख चाचण्या घेण्यात येत आहेत
  • 17 जुलैपर्यंत आकडा 10 लाख आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 20 होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement

देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असली तरी रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. केंद्र सरकारनुसार, मागील 24 तासांत 7419 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रिकव्हरी रेट वाढून 51.08% झाला आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 69 हजार 797 रुग्ण बरे झाले आहे. म्हणजेच संसर्ग झालेल्यांपैकी अर्ध्याहून अधिक लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

आता दररोज 1.50 लाख चाचण्या घेण्यात येत आहेत

देशात 15 दिवसांपूर्वी दररोज 1.25 लाख पर्यंत चाचण्या होत होत्या. तर आता चाचण्यांची संख्या वाढवून 1.50 लाख झाली आहे. मे च्या शेवटच्या आठवड्यात सुमारे सव्वा लाख टेस्ट दररोज केल्या जात होत्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या 1.40 लाख पर्यंत करण्यात आली. आता दररोज 1.50 लाख टेस्ट केल्या जात आहेत.  

तामिळनाडूतील 4 जिल्ह्यात 30 जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला

तमिळनाडूच्या चेन्नई, तिरुवल्लुवर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू या शहरांमध्ये 19 ते 30 जूनपर्यंत लाकडाउन केला जाणार आहे. देशात आता संक्रमितांची संख्या 3 लाख 33 हजार 363 झाली आहे. देशात रविवारी 7364 रुग्ण बरे झाले. 321 रुग्णांचा मृत्यू झाला. दिल्लीत विक्रमी 2224 नवीन रुग्ण वाढले. ही संख्या सलग तिसऱ्या दिवशी 2 हजारांपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात 3394 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. 

पाच दिवसांत दररोज 11 हजारांहून अधिक रुग्ण वाढले 

मागील पाच दिवसांपासून दररोज 11 हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत. रविवारी 11 हजार 373 रुग्ण आढळले होते. कोरोनाचा ग्राफ अशाप्रकारे वाढत राहिला तर जूनच्या अखेरपर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5 लाख पार पोहचू शकते. डबलिंग रेट 17.4 दिवसांचा आहे. यानुसार, 18 जुलैपर्यंत ही संख्या 10 लाख आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 20 लाखपर्यंत पोहचू शकते. 

Advertisement
0