आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेना नियंत्रणात:आज व उद्या 4 राज्यांतील 8 जिल्ह्यांत लसीकरणाची रंगीत तालीम, नवे रुग्ण 18732; देशात 6 महिन्यांत सर्वात कमी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२० च्या अखेरीस कोरोनाचा वेग कमी होताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासांत १८७३२ नवे रुग्ण आढळले. हा सहा महिन्यांचा नीचांक आहे. गेल्या १ जुलैला १८६५३ नवे रुग्ण आढळले होते. सक्रिय रुग्ण २.७८ लाख असून तेही सहा महिन्यांत सर्वात कमी आहेत. याबाबतीत जगात भारत १०व्या क्रमांकावर आहे. मृत्युदर ०.४% घटून ताे १.४४% झाला आहे. जगातील १० सर्वाधिक बाधित देशांच्या तुलनेत भारतात मृत्युदर सर्वात कमी आहे. सध्या ब्राझीलमध्ये २.५५%, फ्रान्समध्ये २.४५% लोकांनी जीव गमावला आहे. अमेरिकेत मृत्युदर १.७४% आहे. भारतात एकूण रुग्णसंख्या १,०१,८७,८५० वर गेली आहे. तसेच आतापर्यंत ९७,६१,५३८ जण बरे झाल्याने रिकव्हरीचे प्रमाण वाढून ९५.८२ टक्के झाले आहे.

आज व उद्या ४ राज्यांतील ८ जिल्ह्यांत लसीकरणाची रंगीत तालीम
देशात लवकरच कोरोना लस उपलब्ध होण्याची आशा आहे. यामुळे केंद्र सरकारला लसीचे वितरण आणि लसीकरणासाठी तयार केलेली योजना पडताळून बघायची आहे. याअंतर्गत सोमवारी, मंगळवारी रंगीत तालीम होईल. ती आंध्र, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्ये होईल. या राज्यांतील प्रत्येकी दोन जिल्ह्यांना सामील केले जाईल. लसीकरणादरम्यान वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रियांचे पालन यादरम्यान केले जाईल. या वेळी ज्या त्रुटी आढळतील त्यात प्रत्यक्ष लसीकरणाआधी सुधारणा केली जाईल.

1. नवे रुग्ण 18732; देशात 6 महिन्यांत सर्वात कमी
2. सक्रिय रुग्ण २.७८ लाख जगात दहाव्या क्रमांकावर
3. मृत्युदर १.४४%, टॉप १० देशांत सर्वात कमी

अॅस्ट्राझेनेकाचे सीईओ पास्कल यांचा दावा- आम्ही ‘विजयाचा फॉर्म्युला’ मिळवला, कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठीही आमची लस १०० टक्के प्रभावी
लंडन | ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत लस तयार करत असलेल्या अॅस्ट्राझेनेका कंपनीचे सीईओ पास्कल यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही ‘विजयाचा फॉर्म्युला’ प्राप्त केला आहे. सध्या इंग्लंडचे औषधी नियामक लसीचे मूल्यांकन करत आहे. कोरोनाच्या ज्या गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, त्यांना ही लस १०० टक्के संरक्षण देत असल्याचे यातून दिसून आले आहे. फायझर- बायोएनटेकची लस ९५% तर मॉडर्नाची ९४.५% प्रभावी आहे. चाचणीत आमची लसही तेवढीच प्रभावी ठरेल.’ भारतात अॅस्ट्राझेनेका- ऑक्सफर्डची लस ‘कोविशील्ड’चे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहे.

बातम्या आणखी आहेत...