आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी:रुग्णालयात 'लव्ह यू जिंदगी' या गाण्यावर थिरकत हिंमत देत होती कोरोनाग्रस्त तरुणी, वयाच्या 30 व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. मोनिका लांगेह यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता

कोरोनाच्या अनियंत्रित संसर्गासमोर आज संपूर्ण देशाने हात टेकले आहेत. चारही दिशेंनी केवळ निराशेची भावना आहे. दररोज आपल्याला प्रियजनांच्या आणि जवळच्या लोकांविषयी वाईट बातम्या ऐकायला येत आहेत. नुकताच एक कोरोना पीडित मुलगी लव्ह यू जिंदगी गात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुलीच्या या व्हिडिओचे लोकांनी खूप कौतुक केले होते. पण आता ही मुलगीच कोरोनाविरुद्धची लढाई हरली आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या दिवशी तिने जगाचा निरोप घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. मोनिका लांगेह यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये एक मुलगी शाहरुख खान आणि आलिया भट्टच्या डिअर जिंदगीमधील 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकताना दिसत होती. हा व्हिडिओ शेअर करत मोनिकाने लांगेहने लिहिले होते की, या मुलीला आयसीयू बेड मिळू शकला नाही, यामुळे ती कोविड इमरजेंसी वॉर्डमध्ये गेल्या 10 दिवसांपासून अॅडमिट आहे. तिला NIV सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच तिला रेमडेसिविर आणि प्लाज्मा थेरेपीही दिली जात आहे. ती एक मजबूत मुलगी आहे आणि जिच्यात मजबूत इच्छाशक्ती आहे. ती म्हणाली की, मी एखादे गाणे ऐकू शकते का, ज्याला मी परवानगी दिली.

दरम्यान ही तरुणी दुर्दैवाने आपली आयुष्याशी सुरू असलेली झुंज जिंकू शकली नाही. 'आपण एक शूर आत्मा गमावला आहे. ओम शांती. स्वतःच्या मुलीला कुटुंबियांनी गमावले आहे. त्यांना हे दुःख सहन करण्याचे ताकद देवाने द्यावी.' असे डॉ. मोनिका यांनी ट्विट करत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...