आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Corona Omicron Variant | Outbreak India Live Updates | 14 February | Delhi Mumbai Bhopal Indore Kerala

कोरोना अपडेट्स:24 तासात देशात 34,082 नवीन रुग्ण, 346 मृत्यू; जीव गमावणाऱ्यांचा आकडा 17 जानेवारीनंतर सर्वात कमी

6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 34,082 नवीन रुग्ण आढळले आहेत, 91.8 हजार रुग्ण बरे झाले आहेत, तर 346 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेच्या पीकनंतर प्रथमच मृतांची संख्या इतकी कमी झाली आहे. यापूर्वी 17 जानेवारी रोजी देशात 310 जणांचा मृत्यू झाला होता. देशात 4,71,418 सक्रिय प्रकरणे आहेत.

नवीन केसपासून अॅक्टिव्ह केसमध्ये मोठी घट झाली आहे

 • नवीन केसही 1 जानेवारीनंतरपासून सर्वात कमी आहेत. तेव्हा 27553 प्रकरणे नोंदवण्यात आले होते. जे तिसऱ्या लाटेच्या पीकवर वाढून 3.47 लाख पर्यंत पोहोचले होते.
 • तिसऱ्या लाटेत अॅक्टिव्ह केस पहिल्यांदा 50 हजारांपेक्षा कमी झाले आहेत. यापूर्वी 7 जानेवारीला 4.72 लाख लोकांवर उपचार सुरु होते. तिसऱ्या लाटेत 23 जानेवारीला सर्वात जास्त 22.49 लाख अॅक्टिव्ह केस होते.
 • अशा प्रकारे 13 फेब्रुवारीला बरे होणाऱ्या संक्रमितांची संख्या 91,859 होती. जी 11 जानेवारीनंतर सर्वात कमी आहे. तेव्हा 60,405 लोकांनी या आजाराला मात दिली होती.

देशातील कोरोनावर एक नजर

 • एकूण कोरोना केस: 4.26 करोड़
 • एकूण रिकव्हरी: 4.16 करोड़
 • एकूण मृत्यू : 5.09 लाख
 • अॅक्टिव केस: 4.71 लाख

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,502 नवे रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 17 जणांचा मृत्यू झाला असून 9815 लोक बरे झाले आहेत. याच्या एक दिवस आधी, शनिवारी 4,359 नवीन रुग्ण आढळले. या दरम्यान 32 लोकांचा मृत्यू झाला असून 12,986 लोक बरे झाले आहेत.

महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत येथे एकूण 78.42 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 76.49 लाख लोक बरे झाले आहेत, तर 143,404 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...