आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेट्स:गेल्या 24 तासांत 30 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले, 541 जणांनी गमावला जीव; नाइट कर्फ्यूसह लवकरच कमी होऊ शकतात निर्बंध

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 30,757 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 67,457 रुग्ण बरे झाले, तर 541 लोकांचा मृत्यू झाला. देशात सातत्याने घटत असलेल्या कोरोनाच्या घटना पाहता केंद्र सरकारने राज्यांना निर्बंध कमी किंवा काढून टाकण्यास सांगितले आहे. तसेच केंद्राने म्हटले आहे की, पॉझिटिव्हिटी रेटची समिक्षा केल्यानंतरच निर्बंधांमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला जावा.

देशातील 95% रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे
सरकारच्या तज्ज्ञ समितीच्या मते, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात आढळलेल्या एकूण कोरोना प्रकरणांपैकी 95% रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. यामुळे असे मानले जाते की, आता भारतात डेल्टापेक्षा ओमिक्रॉनची प्रकरणे अधिक आढळत आहेत, ज्यामुळे रिकव्हरी रेट वाढला आहे.

केस कमी होऊन देखील मृत्यू वाढत आहेत
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत दिलासा मिळाला होता. आता त्यांच्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बुधवारी देशात 541 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचवेळी, कोरोनामुळे आतापर्यंत 5.10 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाचे आकडे

एकूण केस4.27 कोटी
एकूण रिकव्हरी4.19 कोटी​​​​​​​
एकूण मृत्यू5.10 लाख
अॅक्टिव्ह केस3.23 लाख

महाराष्ट्र: मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच वेळी, हा आकडा 16 फेब्रुवारी रोजी 41 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 143,492 लोकांना संसर्गामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत रिकव्हरी रेट 97.77 टक्के व मृत्यू दर 1.82 टक्के नोंदवला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...