आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Omicron Variant | Outbreak India Live Updates | 23 February | Delhi Mumbai

कोरोना अपडेट्स:देशात 24 तासात 13,807 नवीन रुग्ण, 279 मृत्यू; UAE ने भारतासह 3 देशांच्या प्रवाशांना RT-PCR मधून दिली सूट

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 13,807 नवे रुग्ण आढळले आहेत, 31,375 रुग्ण बरे झाले आहेत, तर 279 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 17,847 ने कमी झाली आहे. सोमवारी एक दिवस आधी, 13,348 नवीन रुग्ण आढळले आणि 235 लोकांचा मृत्यू झाला होता.

आता भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेतून यूएईला जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर पोहोचल्यानंतर RT-PCR टेस्ट करण्याची आवश्यकता नसेल. या 4 देशांमधून अबुधाबीला जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या नियमांतून सूट देण्यात आली आहे. इतिहाद एअरलाइन्सनेही ट्विटरवर याची पुष्टी केली आहे.

देशातील कोरोनाची स्थिती

  • एकूण प्रकरणे- 42,865,706
  • एकूण रिकव्हरी- 42,179,578
  • एकूण सक्रिय प्रकरणे - 155,576
  • एकूण मृत्यू - 512,331

अमेरिकेतील सक्तीच्या लसीकरणाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली
सक्तीच्या लसीकरणाविरोधात आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखल केलेली याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. याचिकेत धार्मिक आधारावर लसीकरणात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी धार्मिक कारणास्तव लसीकरणावर आक्षेप घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...