आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Corona Outbreak: Corona Eruptions Shook Governments In Six Countries, Including Brazil; News And Updates

महामारी:ब्राझीलसह सहा देशांत कोरोना स्फोटाचे सरकारनाही हादरे; या देशांनी उचलले कठोर पावले, नेते बनले मजबूत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोरोना नियंत्रणात अपयश आल्याने ट्रम्प यांना गमवावी लागली खुर्ची, इटलीतही बदल

जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. महामारीमुळे आतापर्यंत १३.१४ कोटी लोक बाधित झाले. २८.६ लाख लोकांना प्राण गमवावे लागले. लोक बेहाल आहेत. काही देशांत सरकारचेही भवितव्य कोरोनाच्या विरोधातील लढाईवर अवलंबून ठरत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे अमेरिका. महामारीचा पहिल्यांदाच अत्यंत वाईट पद्धतीने मुकाबला केल्याचे अमेरिकेच्या इतिहासात दिसते. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत पराभवाला तोंड द्यावे लागले. सर्वाधिक बाधित ब्राझीलसह ६ देशांत कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात बेपर्वाई झाली त्यामुळे तेथील सरकारे डळमळीत झाली आहेत.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत ४ वेळा आरोग्यमंत्री बदलण्यात आले. इटलीत पंतप्रधान बदलण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी कोरोनाविरोधातील कमकुवत लढाई हेच कारण आहे. स्पेेन, फ्रान्स, मेक्सिकोच्या राष्ट्रप्रमुखांना विरोधी पक्षांसह जनतेच्या रोषालाही तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाचा मुकाबला करणारे न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, तैवान, भारत, चीनसह अनेक देशांत राष्ट्रप्रमुखांची स्थिती बळकट झाली आहे.

हे मजबूत- कोरोनाशी लढून बेंजामिन यांचा उदय

 • न्यूझीलंडच्या पंतप्रधान आदर्श : कोरोनाच्या विरोधात सर्वोत्कृष्ट पद्धतीने लढाई करणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न आदर्श ठरल्या. देश १४ डिसेंबरलाच कोरोनामुक्त झाला. आता देश दक्षता स्तर-१ मध्ये दाखल.
 • इस्रायलमध्ये बेंजामिन बळकट : इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या आघाडीला बहुमत नसले तरी देशात त्यांची विश्वासार्हतेत वाढ झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात वेगवान लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आला.
 • ब्रिटिश पंतप्रधानांचे कौतुक : एकेकाळी अनियंत्रित असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी वेगाने लसीकरण केल्याने पंतप्रधान जॉन्सन मजबूत झाले. त्यांचे कौतुक झाले.
 • दक्षिण कोरियात मून मजबूत : राष्ट्रपती मून जेई इन यांनी कोरोना रोखण्याच्या नियमांचे जनतेने पालन केले. त्यामुळेच गतवर्षीच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा मोठा विजय.

हे कमकुवत- राष्ट्रपती बोलसोनारोंची फटफजिती

 • जापान: नव्या लाटेचा सामना करण्याची प्रक्रिया मंद असल्याने पंतप्रधान योशीहाइड सुगा यांच्यावर सातत्याने दबाव वाढतोय. जनमत पाहणीत प्रयत्न मंदावल्याचे लोकांना वाटते.
 • जर्मनी: २९ लाख रुग्ण असलेल्या जर्मनीत चान्सलर अँजेला मर्केल यांची पाहणीत लोकप्रियता २२ टक्के दिसून आली. सीडीयूसएसयू पक्षांच्या पाठिंब्यात घसरण.
 • फ्रान्स : राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या लोकप्रियतेत २९ टक्के घट झाली. गेल्या महिन्यात ३४ टक्के लोकांची पसंती. आधी लोकप्रियता ४० टक्क्यांहून जास्त.
 • ब्राझील : लॉकडाऊनविरोधी बोलसोनारो यांनी कोरोनाला सामान्य फ्लू संबोधले. लस घेतल्यानंतर व्यक्ती मगर किंवा दाढीवाल्या महिलेत रूपांतरित होऊ शकते. परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने चार वेळा मंत्रिमंडळात बदल करावा लागला. ब्राझीलमध्ये १.३ लोक बाधित झाले.

बातम्या आणखी आहेत...