आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Outbreak In Delhi | After 3 Days, There Will Be No Beds Left In Delhi, The Report Said

खळबळजनक:3 दिवसांनी दिल्लीत बेडच शिल्लक राहणार नाहीत, वाढत्या रुग्णसंख्येत समितीचा खळबळजनक अहवाल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासगी रुग्णालयांत राखीव बेडचा काळाबाजार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आरोप
Advertisement
Advertisement

देशात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ३७ हजारांहून अधिक झाली आहे. तर, दिल्लीत रुग्णालयांत बेड कमी पडू लागले आहेत. दिल्ली सरकारच्या पाच डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील समितीने यासाठी केवळ दिल्ली भागातील रुग्णांनाच या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले जावे, अशी शिफारस केली आहे. इंद्रप्रस्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेश वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने म्हटले आहे की, बाहेरराज्यातील रुग्णांना दिल्लीतील रुग्णालयांत दाखल करणे बंद केले नाही तर तीन दिवसांनंतर राज्यात कोणत्याच रुग्णालयात बेड शिल्लक राहणार नाहीत. दरम्यान, समितीच्या या शिफारशी लागू करायच्या की नाही हे राज्य सरकार ठरवेल.

दिल्लीत कोरोना रुग्णांसाठी करण्यात आलेल्या विशेष व्यवस्थेअंतर्गत ९ हजार ३०० बेड असून यातील ३,९०० बेडवर सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्णांचा एकूण आकडा २६ हजारांच्या वर गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

बेडचा काळाबाजार : केजरीवाल

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खासगी रुग्णालयांत राखीव बेडचा काळाबाजार होत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता प्रत्येक खासगी रुग्णालयात रिसेप्शनवर एक वैद्यकीय क्षेत्रातील सरकारी व्यक्ती असेल, असेही त्यांनी जाहीर केले. ही व्यक्ती सरकारला रोज अहवाल देईल. यात काही घोटाळे आढळले तरी राज्य सरकार कठोर कारवाई करेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

नियमांना फाटा; सर गंगाराम रुग्णालयावर दिल्लीत गुन्हा

दिल्ली सरकारने प्रसिद्ध सर गंगाराम रुग्णालयाविरुद्ध चाचणी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. केंद्राचे नियम डावलल्याचा आरोप या रुग्णालयावर ठेवण्यात आला आहे. या रुग्णालयाच्या व्यवस्थापननोही ही चूक मान्य केली आहे.

Advertisement
0