आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त आले. तेथे नव्या रुग्णांत सुमारे ८ हजारांची घट झाली.
मराठवाड्यात औरंगाबाद वगळता शुक्रवारी ४८७१ रुग्ण आढळले. ४६,६२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या - (कंसात मृत) : जालना ६८८ (१०), परभणी ६२० (२३), हिंगोली १३२ (६), नांदेड ५६८ (१५), लातूर ८८९ (३२), उस्मानाबाद ६६० (८), बीड १३१४ (१९).
विदर्भात शुक्रवारी २१० रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात १३,०६८ नवे रुग्ण आढळले. मृतांत नागपूरच्या ७९, भंडारा ११, चंद्रपूर २३, गाेंदिया ८, वर्धा २१ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ जणांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.