आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Outbreak In India: In Country Found 3 Lakh New Patients Of Covod 19 In One Day; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात संसर्गाची सुनामी:कोरोनाने विक्रम मोडले, एका दिवसात सापडले तब्बल 3.15 लाख नवे रुग्ण; जगात रोज आढळणारे 40% रुग्ण आता भारताचे

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दर 100 चाचण्यांत 16 रुग्ण आढळत आहेत

देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.

मात्र, आता ३ लाख नव्या रुग्णांत महाराष्ट्रातील फक्त २०% रुग्ण आहेत. उर्वरित ८०% इतर राज्यांतील आहेत. विशेष म्हणजे देशातील निम्मे रुग्ण फक्त महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत आढळत आहेत. रुग्णवाढीचा सर्वाधिक वेग केरळमध्ये आहे. येथे निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर रुग्णसंख्या ३ हजारांवरून २२ हजारांवर गेली आहे.

७ दिवसांत १७.३७ लाख रुग्ण, तर सर्वात संक्रमित देश अमेरिका-ब्राझीलमध्ये एकूण ९.१९ लाख रुग्ण
भारतात ७ दिवसांत १७.३७ लाख रुग्ण आढळले, तर या काळात अमेरिका आणि ब्राझीलमध्ये एकूण ९.१९ लाख रुग्ण आढळले. विशेष म्हणजे या दोन देशांत रुग्ण घटत आहेत, तर भारतात वाढत आहेत.

१५ दिवसांत १ वरून ३ लाख रुग्ण, अमेरिकेत ते ६१ दिवसांत झाले होते
देशात रोजचे रुग्ण १५ दिवसांत १ वरून ३ लाख झाले. अमेरिकेत असे ६१ दिवसांत झाले होते. भारतात आकडा २ वरून ३ लाख होण्यासाठी ६ दिवस लागले. १ वरून २ लाख होण्यास ९ दिवस लागले होते.

जगात रोज आढळणारे ४० टक्के रुग्ण आता भारताचे, तेही सर्वाधिक
जगात ३ दिवसांत २१.२० लाख रुग्ण आढळले. त्यापैकी ८.४२ लाख भारतात आढळले. त्याआधी रोज आढळणाऱ्या रुग्णांत भारताचा वाटा कधीही ३०% पेक्षा जास्त नव्हता. आता ४०% आहे.

हा १५ महिन्यांच्या कोरोना काळात जगातील सर्वात मोठा आकडा
एका दिवसात ३.१४ लाख रुग्ण याआधी कोणत्याही देशात आढळले नाहीत. त्याआधी एका दिवसात सर्वाधिक ३.०७ लाख रुग्ण २ जानेवारीला अमेरिकेत आढळले होते. तेव्हा तिथे संसर्गाचा पीक होता.

इतर राज्यातही वाढत आहे रुग्ण
१५ दिवसांपूर्वी देशातील निम्मे रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळत होते. आता देशातील निम्मे रुग्ण ५ राज्यांत आढळत आहेत, त्यावरून संसर्ग किती पसरला आहे याचा अंदाज करता येऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...