आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Outbreak In India: In India Patients Number Over 2 Crore; News And Live Updates

कोरोना देशात:कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटींपार; 50 लाख रुग्ण फक्त 15 दिवसांत आढळले, पहिले 50 लाख 230 दिवसांत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोजचे रुग्ण भारतात सर्वाधिक, लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वात बिकट परिस्थिती ब्राझीलची

देशात कोरोना महामारीची लाट येऊन १५ महिने उलटले आहे. दरम्यान, देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. विशेष म्हणजे भारतात १५ महिन्यांच्या कोरोनाकाळात एकूण रुग्णांची संख्या २.०२ कोटी झाली आहे. यापैकी १.६६ कोटी कोरोनामुक्त झाले आहेत. ३५ लाखांवर उपचार सुरू आहेत. २.२२ लाख लोकांचा मृत्यू झाला.

कोरोना महामारीचा हा वेग थांबला नाही तर याच महिन्यात आकडा ३ कोटींवर जाणार असल्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. देशात १८ एप्रिलनंतर नवे रुग्ण सापडण्याचा वेग वाढला असून तो कायम आहे. दररोजच्या रुग्णांचा आकडा ४ लाखांना स्पर्श करून आला आहे. १८ एप्रिलला संख्या २ लाख होती.

मोठी चिंता: दर ५ चाचण्यांमागे १ रुग्ण

नवे रुग्ण प्रति 10 लाख लोकसंख्या

  • जगातील प्रमुख देशांत संसर्गाचा फैलाव कित्येक पटींनी घटला आहे. ब्रिटनमध्ये १ हजार चाचण्यांत १ रुग्ण सापडतोय.
  • लोकसंख्येच्या हिशेबाने अमेरिकेत आता १५० लोक/१० लाख व ब्राझीलमध्ये २७८ लोक/१० लाख रोज संक्रमित होत आहेत.
  • जगात सर्वात जास्त ३.३२ कोटी रुग्ण अमेरिकेत आहेत. भारतात सर्वाधिक ४८ लाख रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत.

बातम्या आणखी आहेत...