आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Outbreak In India : India Beat Brazil In Corona Case. India In Second Largest Country In World Having The Most Corona Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:एकूण रुग्णसंख्या 41.96 लाखांवर; बंगळुरुमध्ये 27 वर्षीय तरुणीला दुसऱ्यांदा झाले कोरोना संक्रमण, राज्यात याप्रकारचे पहिलेच प्रकरण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो नवी दिल्लीतील मेट्रो यार्डचा आहे. सोमवारपासून राज्यात मेट्रो सुरू होणार आहेत. यापूर्वी सर्व ट्रेन सॅनिटाईज करण्यात येत आहेत.
  • महाराष्ट्रात रविवारी 23,350 नवीन रुग्णांची नोंद

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 41.96 लाखांवर पोहचली आहे. रविवारी देशभरात 85,300 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासोबतच देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 41,96,130 पेक्षा जास्त झाला आहे. तसेच, रविवारी झालेल्या 1060 मृत्यूंसह एकूण मृतांचा आकडा 71,739 झाला आहे. सध्या देशात 8,82,793 रुग्णांवर उपचार सुरू असून, 32,40,980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

यादरम्यान, बंगळुरूमध्ये एका 27 वर्षीय तरुणीला ठीक झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. याप्रकारचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. हॉस्पीटल प्रशासनाने सांगितले की, जुलैमध्ये पहिल्यांदा तरुणीला कोरोना झाला होता, त्यानंतर ती ठीक झाली होती. पण, आता परत एकदा तिला कोरोनाची लागण झाली आहे.

तिकडे महाराष्ट्रात रविवारी तब्बल 23,350 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 9,07,212 झाला आहे. रविवारी झालेल्या 328 मृत्यूसह एकूण मृतांचा आकडा 26,604 झाला आहे. सध्या 2,35,857 रुग्णांवर उपचार सुरू असून, 6,44,400 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

भारत दुसरा सर्वाधिक संक्रमित देश

भारत सर्वाधिक कोरोना संक्रमित देशाच्या यादीत ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझील 40 लाख 91 हजार प्रकरणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात रुग्ण वाढीचा वेग असाच राहिला तर नोव्हेंबरपर्यंत एक कोटी आणि वर्षअखेरीपर्यंत 1 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित होतील. तर 1 लाख 76 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

जगात सध्या संक्रमणाची सर्वाधिक प्रकरणे अमेरिकेत आहेत. येथे 63 लाखांपेक्षा अधिक लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये आता दररोज सरासरी 40 ते 45 हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. भारतात आतापर्यंत 41 लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. देशात दररोज अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा दुप्पट 85 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत.

नोव्हेंबरमध्येच संक्रमितांची संख्या 1 कोटी पार होईल

देशात रुग्ण वाढीचा वेग असाच राहिल्यास नोव्हेंबरमध्ये 1 कोटी 13 लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडतील. सध्या दररोज 85 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत 60 लाख आणि 31 ऑक्टोबरपर्यंत 80 लाखांपेक्षा जास्त रुग्ण होतील.

अॅक्टीव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत आधीपासूनच दुसर्‍या क्रमांकावर

अॅक्टीव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत आधीपासूनच जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. भारतात सध्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 8 लाख 59 हजारांपेक्षा जास्त आहे. जगातील एकूण संक्रमितांपैकी 37.40% अॅक्टीव्ह रुग्ण अमेरिकेत आणि 12.18% रुग्ण भारतात आहेत. ब्राझीलमध्ये अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 11.90% आहे.

पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 2% घसरण

जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये चाचण्यांची संख्या जास्त झाली, तर दुसरीकडे पॉझिटिव्हिटी रेट देखील कमी झाला. ही दिलासादायक बाब आहे. आकडेवारीनुसार, जूनमध्ये 49 लाख लोकांची चाचणी झाली आणि त्यांपैकी 3.59 लाख लोक पॉझिटिव्ह आढळले. अशाप्रकारे जुलैमध्ये 1.53 कोटी टेस्ट झाल्या, ज्यामध्ये 10.55% अर्थात 11.11 लाख लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ऑगस्टमध्ये 2.39 कोटी लोकांच्या चाचण्या झाल्या आणि यामध्ये 8.30% (19.90 लाख) लोक संक्रमित आढळले.

भारतात प्रत्येक 100 रुग्णांपैकी 77 आणि रशियामध्ये 82 रुग्ण बरे होत आहेत

जगातील टॉप-5 संक्रमित देशांमध्ये सर्वाधिक चांगला रिकव्हरी रेट (82.03%) रशियाचा आहे. येथे मृत्युदर 1.73% आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर 77.34% आहे. म्हणजेच दर 100 रुग्णांपैकी 77 रुग्ण बरे होत आहेत. ही आकडेवारी सतत वाढत आहे. भारतातील मृत्युदर देखील टॉप-5 देशांच्या यादीत सर्वात कमी आहे. देशात आतापर्यंत सापडलेल्या संक्रमितांपैकी 1.70% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात सर्वाधिक मृत्युदर पेरू देशाचा आहे. येथे आतापर्यंत 4.36% रुग्णांचा बळी गेला आहे.

देशातील 5 राज्यात 60% प्रकरणे आणि 69% मृत्यू झाले

देशात संसर्गाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला. देशातील 41 लाख संक्रमितांपैकी 21.40% रुग्ण येथे आहेत. याशिवाय आंध्र प्रदेशात 11.83% आणि तमिळनाडूत 11.20% रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे मृत्यूच्या बाबतीतही महाराष्ट्रात आतापर्यंत 37.52% मृत्यू झाले आहेत.