आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसर्गाची दुसरी लाट चाचण्यांच्या बळावर रोखण्यात दक्षिण भारतातील राज्ये खूप पुढे आहेत. इतकेच नव्हे तर लोकसंख्येच्या तुलनेतही दाक्षिणात्य राज्यांतच सर्वाधिक चाचण्या होत आहेत. देशात दुसरी लाट १ मार्चनंतर सुरू झाली. यानंतर केरळ, आंध्र, तामिळनाडू, तेलंगण व कर्नाटकने रोजच्या चाचण्या साडेतीन पट (सरासरी) वाढल्या. यूपी, हरियाणा, दिल्ली व पंजाबने मात्र सरासरी दुप्पटही वाढवल्या नाहीत. यूपी-बिहारसारखी काही राज्ये सर्वाधिक टेस्ट केल्याचा दावे करतात, मात्र लोकसंख्येशी प्रमाण बघता ही दोन्ही राज्ये टॉप-२० मध्येही येत नाहीत. चिंतेची दुसरी बाब म्हणजे, ही राज्ये संसर्गाचा ‘पीक’ लवकर येण्याचा दावा करत आहेत. मात्र, या राज्यांत संसर्गाचा दर सध्या २०% हून जास्त नाही. डब्ल्यूएचओनुसार, संसर्गाचा दर ५% पेक्षा जास्त असल्यास स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे समजले जाते. ३३ कोटी लोकसंख्येच्या अमेरिकेत ४३ टेस्ट कोटी झाल्या आहेत. १३० कोटींच्या भारतात केवळ ३० कोटी टेस्ट झाल्या आहेत. अमेरिकेने संसर्गाचा दर कधीही १५% वर जाऊ दिला नाही. भारतात मात्र तो २३% इतका झाला आहे.
राज्यांचे रिपोर्ट कार्ड
सरकारे जेव्हा म्हणतात की, पीक येतोय, तेव्हा हा दावा ३ निकषांवर स्वत:च तपासून पाहा
पहिला... रोजच्या रुग्णवाढीचा दर कमीत कमी दोन आठवड्यांपासून सतत घटत असल्यास
उदाहरणार्थ - महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये १४ दिवसांपेक्षा जास्त काळापासून रोजच्या रुग्णांची संख्या घटत अाहे. हा पीक येण्याचा पहिला संकेत आहे, मात्र पीकसाठी फक्त इतकेच पुरेसे नाही.
दुसरा... सक्रिय रुग्णांची एकूण संख्या गेल्या सात दिवसांपासून सततपणे घटत असेल तर...
महाराष्ट्र, छत्तीसगड व उत्तर प्रदेशात सक्रिय रुग्ण ७ दिवसांपासून सातत्याने घटत आहेत. याआधारे पीकचे दावे होताहेत. तथापि, हा पीक आकलनाचा महत्त्वाचा निकष आहे, मात्र केवळ याच आधारे पीक आल्याचे मानून चालणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.
तिसरा... टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट ५%पेक्षा कमी असणे गरजेचे, हाच सर्वात मोठा संकेत महाराष्ट्रासह काही राज्यांत पीक येणार असल्याचा दावा होत आहे. पण महाराष्ट्रात पॉझिटिव्हिटी रेट अजूनही २०.८% आहे. डब्ल्यूएचनुसार, संसर्गाचा दर ५% च्या खाली असेल तरच पीक मानला जाऊ शकतो. तथापि, थोडा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात संसर्गाच्या दरात घसरण सुरू झाली आहे. तो २६% पर्यंत पोहोचला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.