आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Outbreak In India | The Fastest Speed Of Corona Now In India, Cases Are Doubling Every 17 Days, If Such A Speed, There Will Be More Than 10 Million Cases In India By September.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:भारत जगातील चौथा सर्वाधिक संक्रमित देश, 17 दिवसांत दुप्पट होताहेत रुग्ण, ऑगस्टपर्यंत अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण होतील, सप्टेंबरपर्यंत 1 कोटी प्रकरणे

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाचण्यांबाबत अमेरिका सर्वात पुढे, 2.26 कोटी लोकांची चाचणी झाली, भारतात 52 लोकांची तपासणी केली

भारत कोरोनामुळे जगातील चौथा सर्वाधिक संक्रमित देश ठरला आहे. आतापर्यंत या यादीत भारत सहाव्या स्थानावर होता. परंतु मागील काही दिवसांत देशात संक्रमितांच्या संख्या झपाट्याने वाढली. यामुले एका दिवसात भारत स्पेन आणि युकेला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. 

बुधवारपर्यंत युके चौथ्या आणि स्पेन पाचव्या क्रमांकावर होता. भारतापुढे आता फक्त अमेरिका, रशिया आणि ब्राझील हे तीन देश आहेत. आपल्याकडे जर अशाच गतीने कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर 25 ते 30 ऑगस्टपर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक संक्रमित देश होईल. 

तोपर्यंत ब्राझीलमध्ये यापेक्षा गंभीर परिस्थिती होईल. ब्राझीलमध्ये सध्याच्या गतीने रुग्णसंख्या वाढत राहिली तर 25 जुलै पर्यंत अमेरिकेला मागे टाकत कोरोना प्रभावित देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचेल. 

देशात 4.30% च्या ग्रोथ रेटने संक्रमितांचा संख्या वाढत आहे

कोरोना प्रभावित टॉप 6 देशांमध्ये भारताचा ग्रोथ रेट सर्वाधिक आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 4.30% दराने वाढत आहे. ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे 4.26% ग्रोथ रेट आहे. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संगठनाची आहे. जगात सर्वात कमी ग्रोथ रेट स्पेनचा आहे. येथील संक्रमितांची संख्या 0.10% दराने वाढत आहे. 

14 ऑगस्टपर्यंत, ब्राझीलमध्ये संक्रमितांची संख्या 1 कोटी पार असू शकते

डबलिंग रेटमध्ये ब्राझील अव्वल आहे. येथे 16 दिवसांत संक्रमितांची संख्या दुप्पट होत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग असाच राहिला तर पुढील 64 दिवसांत अर्थात 14 ऑगस्टपर्यंत येथील संक्रमितांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त होईल. 

भारताचा डबलिंग रेट 17 दिवसाचा आहे. येथील संक्रमितांची संख्या 17 दिवसांत दुप्पट होत आहे. हाच वेग राहिला तर 102 दिवस 21 सप्टेंबरपर्यंत भारतातील संक्रमितांची संख्या 1 कोटी पार होऊ शकते. स्पेनचा सर्वात कमी डबलिंग रेट आहे. येथे 1 कोटींचा आकडा होण्यास 408 दिवस लागतील. 

चाचणीमध्ये अमेरिका आघाडीवर आहे

इंडियन मेडिकल काउंसिल फॉर रिसर्च (आईसीएमआर) च्या मते, भारतात आतापर्यंत 52 लाख 32 हजार 245 चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांबाबत अमेरिका भारतापेक्षा चार पटीने पुढे आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 26 लाख 90 हजार 765 लोकांची चाचणी झाली. यातील 9.23% लोक संक्रमित आढळले. 

ब्राझीलमध्ये सर्वात वाईट स्थिती आहे. येथे आतापर्यंत 12 लाख 64 हजार 780 लोकांची चाचणी झाली. यातील 74.22% म्हणजे 7 लाख 80 हजार 765 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 

बातम्या आणखी आहेत...