आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून आता याची झळ सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात स्टाफमधील अनेक सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सर्व सुनावणी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगव्दारे होतील. ही सुनावणी ठरलेल्या वेळेपेक्षा एक तास उशीरा सुरु होईल. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती आपल्या निवासस्थानावरुन व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून संबंधित याचिकेवर सुनावणी करतील. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हा पर्याय स्विकारला आहे.
सर्वोच्च न्यायालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयातील कोर्ट रुमला संपूर्ण सॅनिटाईज केले जात आहे. त्यामुळे इथून पुढच्या सर्व सुनावण्या संबंधित खंडपीठाच्या न्यायमूर्तीच्या निवासस्थानावरुनच होतील.
एका दिवसांत एक लाख 69 हजार 914 नवीन रुग्ण आढळले आहे
देशात कोरोनाचे रुग्ण रोज नवे विक्रम नोंदवत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये एक लाख 69 हजार 914 प्रकरणे समोर आली आहेत. हा देशात एका दिवसात आढळणाऱ्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 10 एप्रिलला 1 लाख 52 हजार 565 नवीन रुग्ण समोर आले होते. दुसरीकडे नवीन संक्रमितांसह मृतांचा आकडाही सलग वाढत आहे. काल (रविवारी) 904 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हे गेल्या 6 महिन्यात एका दिवसात जीव गमावणाऱ्यांचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 17 अक्टोबरला सर्वात जास्त 1,032 लोकांचा मृत्यू झाला होता.
अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा देखील आज 12 लाखांचा आकडा ओलांडणार आहे. काल यामध्ये 93,590 ची वाढ झाली. यासोबतच अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 11 लाख 95 हजार 960 वर पोहोचला.
आतापर्यंत 1.33 कोटी लोक संक्रमित
देशात आतापर्यंत 1 कोटी 35 लाख 25 हजारांपेक्षा जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 1 कोटी 21 लाख 53 हजार लोक बरे झाले आहेत. 1 लाख 70 हजार 209 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.