आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Outbreak In India: World Experts Say Death In India Could Have Been Prevented; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाप्रलयाचे कारण:वेळ घालवली, भारतात बेपर्वाईमुळे तांडव; जगभरातील तज्ञ म्हणाले- भारतातील मृत्यू पूर्वीच रोखता आला असते

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन आठवड्यांत नव्या रुग्णसंख्येत वाढ होण्याचा संशोधकांचा अंदाज
  • दिल्ली, मुंबई, अहमदाबादमध्ये आयसीयू फुल्ल, स्मशानभूमीतही रांगा

देशात कोरोना महामारीने आपत्तीचे रूप घेतले आहे. गेल्या वर्षी १८ जून रोजी ११ हजार रुग्ण आढळून आले होते आणि ६० दिवसांत सरासरी दररोज ३५ हजार रुग्ण आढळून येत होते. १० फेब्रुवारीला दुसरी लाट सुरू झाल्यानंतर दररोज ११ हजार रुग्णसंख्या होती. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळत आणि आता केवळ १५ दिवसांत नव्या रुग्णसंख्येत ३ लाखांचा विक्रम घडू लागलाय. जगात ही संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत देशात अधिकृतपणे कोरोनामुळे १.८४ लाख मृत्यू झाले.

दुसऱ्या लाटेत कोरोनाचा वेग प्रचंड वाढला. दिल्ली, मुंबई, अहमदाबादमध्ये रुग्णशय्या व आयसीयू शिल्लक राहिलेले नाहीत, अशी स्थिती आहे. भारतात काेविड-१९ ची नवी रूपे तांडव घेऊन आले आहे. बी. १.६१७ नावाच्या या नव्या विषाणूत असामान्य म्युटेशन ई ४८४ क्यू व एल ४२५ आर आहे. त्याला डबल म्युटेंट व्हेरिएंट म्हटले जात आहे. तो वेगाने बाधित करू लागला आहे. परंतु कोरोनाविरोधात मिळालेल्या वेळेचा भारताने अपव्यय केला. म्हणूनच कोरोनाने महाप्रलयाचे रूप धारण केले, असे संशोधकांना वाटते.

प्रचारसभांचे आयोजन विज्ञानाशी सुसंगत कसे असू शकते?
विज्ञानाच्या म्हणण्यानुसार लोकांची गर्दी होण्यापासून रोखावे. मग हजारो लोकांना जाहीर सभांतून एकत्रित का येऊ दिले गेले? म्हणूनच अशा स्थितीत सभांचे आयोजन विज्ञानदृष्ट्या तर्कसंगत कसे का? -डॉ. शाहिद जमील, त्रिवेदी स्कूल ऑफ बॉयोसायन्सचे संचालक, अशोका युनिव्हर्सिटी

अयोग्य अधिकाऱ्यांचा हेका, अतिराष्ट्रवादातून संकट
भारतात नेहमीच अयोग्य अधिकाऱ्यांचा हेका दिसून येतो. जनतेत अतिराष्ट्रवाद व येथील राजकीय नेत्यांच्या लोकानुनयातून आजचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ही शक्यता नेहमीच वाटायची. परंतु ते हाताळण्याची तयारी मात्र कधी केली नाही. - मिहिर शर्मा, ब्लूमबर्गचे स्तंभलेखक.

भारताने ब्राझील-ब्रिटनच्या लाटेवरून शिकायला हवे होते
भारताने ब्राझील व ब्रिटनमधील दुसऱ्या व तिसऱ्या लाटेवरून काहीही धडा घेतला नाही. काहीही तयारी केली नाही. आधी दक्षता बाळगणारे लोक दुसऱ्या लाटेत बेपर्वा झाले. हे सुपरस्प्रेडर बनले. -भ्रमर मुखर्जी, बायोस्टॅटिस्टियन, एपिडेमिअोलॉजी, मिशिगन युनिव्हर्सिटी

११-१५ मेदरम्यान पीक शक्य, तेव्हा ३५ लाख रुग्ण शक्य
देशातील वैज्ञानिक गणितीय मॉडेलच्या आधारे दुसऱ्या लाटेतील पीकचा वेध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचे पीक ११ ते १५ मेदरम्यान दुसऱ्या लाटेचे संकट येण्याची शक्यता आहे. तेव्हा देशात बाधितांची संख्या ३३-३५ लाख असेल. म्हणजे तीन आठवड्यांपर्यंत नवीन रुग्णांची संख्या वाढत राहील. पीक आल्यानंतर या संख्येत घट होईल. गणना खरी ठरल्यास दुसऱ्या लाटेतील पीक पहिल्या लाटेपेक्षा तीनपट जास्त असेल. गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला पहिली लाट आली होती. तेव्हा देशात सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे १० लाख होती. या प्रतिमानानुसार दिल्ली, हरियाणा, राजस्थान व तेलंगणात पीक २५-३० एप्रिलपर्यंत येऊ शकते. आेडिशा, कर्नाटक व पश्चिम बंगालमध्ये १-५ मे व तामिळनाडू, आंध्रात ६-१० मेपर्यंत शक्य आहे. या गणनेनुसार महाराष्ट्र व छत्तीसगड पीकवर पोहोचले आहे.

बातम्या आणखी आहेत...