आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Outbreaks Appear To Be Exacerbated In Neighboring Kerala, Tamil Nadu And Andhra Pradesh

कोरोनाचा भीतिदायक ट्रेंड:आता केरळचे शेजारी कर्नाटक, तामिळनाडू व आंध्रात रुग्णवाढ, दक्षिणेतील आणखी 3 राज्यांत वाढत आहे संसर्गाचा दर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील 70% नवे रुग्ण अजूनही केरळ आणि महाराष्ट्रातच आढळत आहेत

दक्षिण भारतात केरळनंतर आता कर्नाटक आणि तामिळनाडू या त्याच्या शेजारील राज्यांत रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तामिळनाडूचा शेजारी आंध्र प्रदेशात नव्या रुग्णांत वाढीचा ट्रेंड दिसत आहे. या तिन्ही राज्यांत रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या मेपासून सतत घटत होती, पण आता वाढत आहे. विशेष म्हणजे तिन्ही राज्यांत संसर्गाच्या दरात वाढही एकाच वेळी सुरू झाली आहे. दुसरीकडे, केरळमध्ये अजूनही रोज सरासरी २२ हजारांवर नवे रुग्ण आढळत आहेत. नव्या रुग्णांच्या हिशेबाने केरळनंतर महाराष्ट्र दुसरे सर्वाधिक संक्रमित राज्य आहे. तेथेही २० जुलैनंतर ५ ऑगस्टला पुन्हा ९ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले. देशातील ७०% नवे रुग्ण केरळ-महाराष्ट्रातच आढळत आहेत.

एक्स्पर्ट व्ह्यू : नवे रुग्ण अवश्य वाढलेे, पण त्याला तिसरी लाट म्हणणे घाईचे
नॅशनल कोविड टेक्निकल टास्क फोर्सचे सदस्य प्रा. के. श्रीनाथ रेड्डी यांच्या मते, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात भलेही रुग्णांची संख्या वाढत असली तरी तिला तिसऱ्या लाटेची सुरुवात किंवा चाहूल म्हणणे सध्या घाईचे ठरेल. रुग्णांच्या संख्येतील या वाढीचा वेग कमी आहे. रुग्णांच्या संख्येत अचानक वेगाने वाढ दिसल्यास ती तिसरी लाट म्हणता येऊ शकते. उदा. एखाद्या राज्यात रोजचे रुग्ण आठवडाभरातच दुप्पट होत असतील तर. पण दक्षिणेकडील राज्यांत सध्या तरी असा धोकादायक ट्रेंड दिसत नाही.

बातम्या आणखी आहेत...