आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Patient Growth Sustained; However A 37% Reduction In Patients On Ventilators

कोरोना:रुग्णवाढ कायम; मात्र व्हेंटिलेटरवरील 37%, तर आयसीयू बेडवरील रुग्णांत 40% पर्यंत घट

कोची/नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाविरुद्ध लस किती प्रभावी आहे, ते या आकडेवारीवर आधारित वृत्तातून स्पष्ट होते. भारतात सर्वाधिक नवे रुग्ण केरळात आढळत आहेत. यामुळे लसीकरणाचा प्रभावही तेथे दिसून येत आहे. केरळात १० मेदरम्यान रोजच्या रुग्णांची सरासरी ३१ हजार होती. आता ४ महिन्यांनंतरही ती ३१ हजारच आहे. म्हणजे रोजचे नवे रुग्ण घटलेले नाहीत. मात्र, रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण १७%, व्हेंटिलेटर सपोर्टवर जाणारे ३७% व आयसीयू बेडचे ४०% रुग्ण घटले आहेत. विशेष म्हणजे, मेमध्येही केरळातील ९०% पेक्षा जास्त रुग्ण डेल्टा व्हेरिएंटचे होते, आताही इतकेच आहेत. म्हणजे व्हायरसचे स्वरूपही तेच आहे. मात्र, चार महिन्यांत लसीचा सिंगल डोस घेतलेली प्राैढ लोकसंख्या २४ टक्क्यांवरून ७३%, तर दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या ४% वरून २८% वर गेली आहे. लसीकरण हेच गंभीर रुग्णांची संख्या घटण्यामागील सर्वात मोठे कारण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कोविशील्डचा दुसरा डोस ४ आठवड्यांतही द्या: हायकोर्ट
काेची | केरळ हायकाेर्टाने केंद्राला आदेश देत सांगितले की, ‘ज्यांना काेविशील्डचा दुसरा डोस ४ आठवड्यांनंतर घ्यायचा आहे, त्यांना मंजुरी दिली जावी. यासाठी कोविन पोर्टलमध्ये आवश्यक बदल करावेत.’ सध्या कोविशील्डचा दुसरा डोस ८४ दिवसांनी दिला जातो.

देशात लसीकरण जसजसे वाढेल, तसतशी गंभीररीत्या आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या घटेल... हाच सर्वात मोठा दिलासा
महामारी तज्ज्ञ डॉ. अरुण म्हणाले, केरळात सुरुवातीपासूनच लसीकरणाचा वेग चांगला राहिला आहे. परिणामी आता गंभीरीरीत्या आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या आधीच्या तुलनेत कमी आहे. यामुळे मृत्युदर ०.५% पेक्षा घटला आहे. म्हणजे, दर २०० कोरोना रुग्णापैकी फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू होत आहे. जानेवारीत दर २़०० रुग्णांपैकी ३ रुग्णांचा मृत्यू ओढवत होता. म्हणजे मृत्युदर तीन पटींनी घटला आहे. लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचा आकडा जसजसा वाढत जाईल तसतसा महामारीमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होत जाईल. लस हेच कोरोनामुळे जीवितहानी रोखण्याचे सर्वात मोठे कवच आहे.

बातम्या आणखी आहेत...